Scam 2003

Scam 2003 : ‘स्कॅम 2003’ वेब सीरिजचा ट्रेलर रिलीज; ‘हे’ मराठमोळे अभिनेते दिसणार महत्वाच्या भूमिकेत

1106 0

स्कॅम 2003 (Scam 2003) ही नवी वेब सीरिज प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या सीरिजमध्ये 2003 मधील तेलगी प्रकरण दाखण्यात येणार आहे. काही दिवसांपूर्वी या वेब सीरिजचा टीझर रिलीज झाला होता त्यांनंतर आता या वेब सिरीजचा ट्रेलर लॉंच करण्यात आला आहे. स्कॅम 2003 या वेब सीरिजच्या ट्रेलरमध्ये काही मराठी कलाकारांची झलक दिसत आहे.

स्कॅम 2003 या हिंदी वेब सीरिजच्या ट्रेलरमध्ये शशांक केतकर (Shashank Ketkar), समीर धर्माधिकारी (Sameer Dharmadhikari) आणि भरत जाधव (Bharat Jadhav) या कलाकारांची झलक पहायला मिळत आहे. तसेच भावना बलसावर यांनी देखील या वेब सीरिजमध्ये महत्वाची भूमिका साकारली आहे. गगन देव रियार (Gagan Dev Riar) हे स्कॅम 2003 या वेब सीरिजमध्ये अब्दुल करीम तेलगीची भूमिका साकारत आहेत.

कधी रिलीज होणार ‘स्कॅम 2003’?
‘स्कॅम 2003’ ही वेब सीरिज 1 सप्टेंबर 2023 रोजी सोनी लिव्ह या ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज होणार आहे.तुषार हिरानंदानी यांनी या सीरिजचे दिग्दर्शन केले आहे. हंसल मेहता यांनी ‘स्कॅम 1992’ ही वेब सीरिज दिग्दर्शित केली होती, पण ‘स्कॅम 2003’ या वेब सीरिजचे ते शो रनर आहेत. ‘स्कॅम 2003’ या वेब सीरिजची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत आहेत.

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!