Sahil Khan

Sahil Khan : महादेव बेटिंग ॲप प्रकरणी बॉलीवूड अभिनेता साहिल खानला अटक

1870 0

मुंबई : महादेव ऑनलाइन बेटिंग ॲप प्रकरणात मुंबई पोलिसांनी नुकतीच एक मोठी कारवाई केली आहे. या प्रकरणात पोलिसांनी प्रसिद्ध अभिनेता साहिल खानला (Sahil Khan) अटक केली आहे. मुंबई पोलिसांच्या एसआयटी पथकाने ही कारवाई केली आहे. साहिल खानवर ऑनलाइन बेटिंग एप्लीकेशन्सचं प्रमोशन केल्याचा आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणात बॉलिवूडच्या अनेक बड्याबड्या अभिनेत्यांचा समावेश आहे.

मुंबई सायबर सेलच्या विशेष तपास पथकाने महादेव सट्टा अप प्रकरणी अभिनेता साहिल खानला छत्तीसगडमधून ताब्यात घेतले आहे. मुंबई उच्च न्यायालयात अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळल्यानंतर साहिलला शनिवारी जगदलपूर येथून अटक करण्यात आली.

साहिल हा Lotus Book 24/7 नावाच्या वेबसाइटचा भागीदार आहे. अभिनेत्याने जामिनासाठी कोर्टात धाव घेतली होती. मात्र त्यांचा जामीन अर्ज फेटाळण्यात आला आहे. हा अभिनेता लोटस बुक 24/7 नावाच्या बेटिंग ॲप वेबसाइटचा भागीदार आहे. हा महादेव बेटिंग ॲप नेटवर्कचा भाग आहे.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

Sharad Pawar : डॉ. अमोल कोल्हे यांच्या प्रचारासाठी शरद पवार मैदानात

Share This News
error: Content is protected !!