Richard Roundtree

Richard Roundtree : ‘ब्लॅक अ‍ॅक्शन हिरो’ अशी ओळख असलेले रिचर्ड राउंडट्री यांचे निधन

792 0

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – ‘ब्लॅक अ‍ॅक्शन हिरो’ म्हणून जगभरात लोकप्रिय असणारे अभिनेते रिचर्ड राउंडट्री (Richard Roundtree) यांचे निधन झाले आहे. ते 81 वर्षांचे होते.पॅनक्रिएटिक कर्करोगामुळे त्यांचे निधन झाले आहे. रिचर्ड यांच्या निधनामुळे त्यांच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे. हॉलिवूड पब्लिकेशन डेडलाईनने रिचर्ड राउंडट्री यांच्या निधनाची बातमी दिली आहे.

रिचर्ड राउंडट्री यांच्याविषयी थोडक्यात माहिती
1971 मध्ये आलेल्या ‘शाफ्ट’ या सिनेमाच्या माध्यमातून रिचर्ड यांनी मनोरंजनसृष्टीत पदार्पण केलं. या पहिल्याच सिनेमाने त्यांना रातोरात सुपरस्टार केलं. अमिरिकेच्या इतिहासतला हा पहिलाच ब्लॅक्सप्लिटेशन सिनेमा आहे. ‘शाफ्ट’ या सिनेमात रिचर्ड यांनी खासगी गुप्तहेराची भूमिका साकारली होती. दमदार कथानक आणि रिचर्डच्या अभिनयाने प्रेक्षकांची मने जिंकली. बॉक्स ऑफिसवर या सिनेमाने चांगलाच गल्ला जमवला होता.

रिचर्ड राउंडट्री यांनी ‘शाफ्ट’ या सिनेमाच्या यशानंतर ‘शाफ्ट इन अफ्रीका’,’स्टील’,’मूविंग ऑन’,’मॅन फ्रायडे’ सारख्या अनेक सिनेमांत आपल्या अभिनयाची जादू दाखवली आहे. रिचर्ड यांची दोन लग्न झाली आहेत. 1963 मध्ये मॅरी जेनसोबत ते लग्नबंधनात अडकले. पण त्यांचं नातं फार काळ टिकलं नाही. अखेर 1973 मध्ये ते विभक्त झाले. त्यानंतर त्यांनी 1980 मध्ये करीन सेरेनासोबत दुसरा संसार थाटला. रिचर्ड यांना निकोल, टेलर, मॉर्गन आणि केली या चार मुली आहेत. त्यांनी जवळजवळ पाच दशकांपेक्षा अधिक काळ सिनेसृष्टीवर राज्य केले आहे.

Share This News
error: Content is protected !!