Rajnikant

Rajinikanth : सुपरस्टार रजनीकांत यांच्या चाहत्यांकडून दोघांना जबर मारहाण

512 0

दिग्गज अभिनेते रजनीकांत (Rajinikanth) यांचा जेलर चित्रपट गुरुवारी (10 ऑगस्ट) रोजी प्रदर्शित झाला. या चित्रपटाची दाक्षिणात्य राज्यांमध्ये प्रचंड क्रेझ पाहायला मिळत आहे. यादरम्यान चेन्नईच्या क्रोमपेट भागातील वेत्री थिएटरबाहेर ‘जेलर’ चित्रपटाला नकारात्मक रिव्ह्यू दिल्याबद्दल रजनीकांत यांच्या चाहत्यांनी दोन व्यक्तींना मारहाण केली आहे.

काय घडले नेमके?
रजनीकांत यांचे चाहते गुरुवारी त्यांच्या चित्रपटाच्या प्रदर्शनाचा आनंद साजरा करण्यासाठी चेन्नईतील वेगवेगळ्या थिएटरमध्ये जमले. त्यांनी फटाके फोडले, रजनीकांत यांची पूजा केली आणि चित्रपटाच्या गाण्यांवर डान्स केला. वेत्री थिएटरमध्ये चाहत्यांनी चित्रपटाचा संगीतकार अनिरुद्धबरोबर ‘हुक्कूम’ गाणे गायले. यावेळी फर्स्ट डे फर्स्ट शो पहिल्यानंतर पत्रकारांशी बोलताना ‘जेलर’ चित्रपटाचा नकारात्मक रिव्हूय दिल्याबद्दल रजनीकांत यांच्या चाहत्यांनी दोन व्यक्तींना बेदम मारहाण केली आहे.

ही मारहाण केल्यानंतर रजनीकांत यांच्या चाहत्यांनी असा दावा केला की ते दोघे थलपती विजयचे चाहते होते म्हणून ते रजनीकांत यांच्या चित्रपटाचे नुकसान व्हावे, यासाठी निगेटीव्ह रिव्ह्यू देत होते. ‘जेलर’ चित्रपटात सुपरस्टार रजनीकांत, मोहन लाल, जॅकी श्रॉफ, शिवा राजकुमार, सुनील, रम्या कृष्णन, विनायकन, मिर्ना मेनन, तमन्ना, वसंत रवी, नागा बाबू आणि योगी बाबू हे महत्वाच्या भूमिकेत आहेत.

Share This News
error: Content is protected !!