Surinder Shinda Death

Surinder Shinda Death : 15 दिवसांआधी आल्या होत्या मृत्यूच्या अफवा; अखेर प्रसिद्ध गायकाचे आज झाले निधन

424 0

मुंबई : प्रसिद्ध पंजाबी सिंगर सुरिंदर शिंदा (Surinder Shinda Death) यांचे आज निधन झाले आहे. ते 64 वर्षांचे होते. मागच्या दोन आठवड्यांहून अधिक काळ ते रूग्णायलात होते. त्यांच्यावर उपचार सुरू होते. शेवटच्या काही दिवसांत त्यांना व्हेटिंलेटरवर ठेवण्यात आलं होतं. अखेर आज सकाळी 7.30 वाजता त्यांचा मृत्यू झाला.त्यांनी पंजाबी म्युझिक इंडस्ट्रीमध्ये खूप मोठे योगदान दिले आहे. ‘ट्रक बिलिया’, ‘पुत्त जट्टान दे’ सारखी अनेक हिट गाणी त्यांनी गायली होती. त्यांच्या निधानामुळे पंजाबी इंडस्ट्रीवर शोककळा पसरली आहे.

धक्कादायक म्हणजे 14 दिवसांआधीच सुरिंदर शिंदा (Surinder Shinda Death) यांच्या निधनाची अफवा पसरवण्यात आली होती. तेव्हा त्यांच्या मुलाने फेसबुक लाइव्ह करत ते सुखरूप असून त्यांच्यावर उपचार सुरू असल्याचं सांगितलं होतं. त्यांच्या निधनाच्या बातम्या खोट्या असल्याचा खुलासा त्यांनी केला होता. सुरिंदर शिंदा यांच्यावर एक महिन्याआधी एक शस्त्रक्रिया करण्यात आली होती. या शस्त्रक्रियेनंतर त्यांच्या शरिरात इन्फेक्शन वाढले होते.

सुरिंदर शिंदा (Surinder Shinda Death) यांचं खरं नाव पाल धम्मी असं होतं. ‘पुत्त जट्टन दे’, ‘जट जियोना मोर’, ‘ट्रक बिलिया’, ‘बलबीरो भाभी’ आणि ‘काहर सिंह दी’ ही त्यांनी गायलेली काही प्रसिद्ध गाणी आहेत.

Share This News
error: Content is protected !!