Prajakta Mali

Prajakta Mali : मन वेडे गुंतले; म्हणतं प्राजक्ता माळीने शेअर केलेल्या ‘त्या’ फोटोनं वेधले चाहत्यांचे लक्ष

895 0

मुंबई : छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्री प्राजक्ता माळीचे (Prajakta Mali) लाखो चाहते आहेत. प्राजक्ता ही सध्या तीन अडकून सीताराम या तिच्या आगामी चित्रपटामुळे चर्चेत आहे. या चित्रपटातील तिची वेगळी भूमिका पाहण्यासाठी प्रेक्षक आतुर आहेत. या सगळ्यात सोशल मीडियावर चर्चेत असणाऱ्या प्राजक्ता माळीनं नुकतीच एक पोस्ट शेअर केली आहे. या फोटो पेक्षा प्राजक्ता माळीने त्याला दिलेल्या कॅप्शननं सगळ्यांचे लक्ष वेधले आहे. प्राजक्तानं तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून हे फोटो शेअर केले आहेत.

या फोटोत प्राजक्तानं पिवळ्या रंगाची साडी नेसली आहे. प्राजक्ता या साडीत खूप सुंदर दिसत आहे. या फोटोत प्राजक्तानं प्राजक्ताराजसाजचे दागिने घातले आहेत. तिचा लूक वेगळाच खूलुन आला आहे. तर हे फोटो शेअर करत प्राजक्ता कॅप्शन देत म्हणाली की ‘ना कळे.. कधी कुठे, मन वेडे गुंतले…पाहिले न मी तूला…’ प्राजक्तानं असं कॅप्शन का दिलं असा प्रश्न तुम्हाला पडला असेल तर. प्राजक्तानं कॅप्शनमध्ये तिचं हे आवडतं गाणं असल्याचं तिनं म्हटलं आहे.

प्राजक्ताच्या तीन अडकून सीताराम या चित्रपटाविषयी बोलायचे झाले तर या चित्रपटात वैभव तत्ववादी, संकर्षण कऱ्हाडे, आलोक राजवाडे, प्राजक्ता माळी, गौरी देशपांडे, आनंद इंगळे, समीर पाटील, विजय निकम आणि हृषिकेश जोशी यांच्या महत्वाच्या भूमिका आहेत. या चित्रपटाचे दिग्दर्शन आणि लेखन देखील हृषिकेश जोशी यांनी केलं आहे. हा चित्रपट 29 सप्टेंबर रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाचा टीझर नुकताच प्रदर्शित झाला आहे.

Share This News
error: Content is protected !!