Prajakta Mali

Prajakta Mali : मराठमोळी अभिनेत्री प्राजक्ता माळी एकेकाळी होती सगळ्यांची पारो…

826 0

छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्री प्राजक्ता माळी (Prajakta Mali) ही सध्या तिच्या ‘तीन अडकून सीताराम’ या चित्रपटामुळे चर्चेत आहे. तिचा हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. त्यानिमित्तानं प्राजक्ता माळी हे चित्रपटाचं प्रमोशन करताना दिसत आहे. याच वेळी एका मुलाखतीत प्राजक्तानं शिक्षक दिनानिमित्तानं तिच्या शाळेतील एक किस्सा सांगितला आहे. यावेळी प्राजक्तानं खुलासा केला की की तिला शाळेत असताना पारो हे नावं देण्यात आलं होतं. त्याचं कारणदेखील तिने यावेळी सांगितलं आहे…

काय आहे तो किस्सा?
प्राजक्ता तिच्या शाळेतील किस्सा सांगत म्हणाली की ‘मी नववीत असताना शाळेच्या गॅदरिंगमध्ये देवदासची पॅरडी केली होती. त्यात देवदासची सगळी गाणी आम्ही केली होती. त्या 10-11 मिनिटांच्या प्रकरणात मी तीन साड्या बदलल्या होत्या. या साड्या एकावर एक नेसल्या होत्या. विंगेत गेले की मी एक साडी काढायचे. मी पहिल्यांदाच शाळेच असताना अशी पॅरडी केली होती. इतकंच नाही तर मी डान्स करायचे तर मी ती कोरिओग्राफही केली होती.’

पुढे प्राजक्ता तिच्या पारो नावाविषयी बोलताना म्हणाली की ‘त्या पूर्ण पॅरडीची मी च हीरोईन होते. त्यानंतरच पूर्ण शाळा मला पारो म्हणून हाक मारू लागले. मग सगळेच मी जर कधी कुठे जाताना दिसले की ‘ए पारोSSS’ अशी हाक मारायचे.’ याविषयी पुढे प्राजक्ता म्हणाली की तिला या सगळ्या गोष्टी आवडायच्या तिला कधी राग आला आहे.

प्राजक्ताच्या तीन अडकून सीताराम या चित्रपटाविषयी बोलायचे झाले तर या चित्रपटात वैभव तत्ववादी, संकर्षण कऱ्हाडे, आलोक राजवाडे, प्राजक्ता माळी, गौरी देशपांडे, आनंद इंगळे, समीर पाटील, विजय निकम आणि हृषिकेश जोशी यांच्या महत्वाच्या भूमिका आहेत. या चित्रपटाचे दिग्दर्शन आणि लेखन देखील हृषिकेश जोशी यांनी केलं आहे. हा चित्रपट 29 सप्टेंबर रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाचा टीझर नुकताच प्रदर्शित झाला आहे.

Share This News
error: Content is protected !!