Engagement

Engagement : ‘या’ मराठमोळ्या अभिनेत्रीने गुपचूप उरकला साखरपुडा, ‘EX Boyfriend’ सोबत अडकणार लग्नबंधनात

722 0

मोस्टलीसेन या नावाने सोशल मीडियावर लोकप्रिय असलेल्या मराठमोळ्या प्राजक्ता कोळीने आपल्या चाहत्यांना एक आनंदजी बातमी दिली आहे. प्राजक्ता कोळीने बॉयफ्रेंड वृशांक खनालसोबत गुपचूप साखरपुडा (Engagement) उरकला आहे. रविवारी सकाळी इन्स्टाग्रामवर फोटो शेअर करत तिने साखरपुड्याची बातमी आपल्या चाहत्यांसोबत शेअर केली. प्राजक्ताने अचानक ही घोषणा केल्यांने सेलिब्रिटींसोबत तिच्या चाहत्यांनादेखील मोठा आश्चर्याचा धक्का बसला आहे.

प्राजक्ता कोळी गेल्या अनेक वर्षांपासून वृशांक खनालसोबत रिलेशनशिपमध्ये आहे. साखरपुड्याची घोषणा करताना तिने दोघांचा फोटो शेअर केला आहे. यावेळी दोघांच्या हातातील अंगठ्या उठून दिसत आहे. इन्स्टाग्रामवर प्राजक्ताने एक पोस्ट शेअर केली आहे. त्यात तिने म्हटलं आहे की, वृशांक आजपासून माझा एक्स बॉयफ्रेंड आहे. आत्तापर्यंत अनेक बॉलिवूड कलाकारांसह सोशल मीडिया स्टार्सनीही तिला शुभेच्छा दिल्या आहेत. प्राजक्ता आणि वृशांक गेल्या कित्येक वर्षांपासून नात्यात आहेत. कॉलेजमध्ये असल्यापासून त्यांची मैत्री आहे. वृशांक हा व्यवसायाने वकील आहे. प्राजक्ताने युट्यूबर म्हणून करिअर सुरू करण्याआधीपासून वृशांकने तिला साथ दिली आहे. अनेकदा प्राजक्ता त्याच्यासोबतचे व्हिडीओ व फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते.

प्राजक्ता कोळी बद्दल बोलायचे झाल्यास ती एक लोकप्रिय युट्यूबर आहे. मोस्टलीसेन असं तिच्या युट्यूबचे नाव आहे. युट्युबरवर प्रसिद्ध झाल्यानंतर तिने बॉलिवूडम व वेबसीरीजमध्येही पदार्पण केले आहे. मिसमॅच या वेबसीरीजच्या माध्यमातून तिने अभिनयक्षेत्रात पदार्पण केले आहे. रोहित सराफसोबत तिची जोडी प्रेक्षकांना चांगलीच भावली होती. त्याचबरोबर जुग जुग जिओ या सिनेमाच्या माध्यमातून तिने बॉलिवूडमध्ये प्रदार्पण केले.

Share This News
error: Content is protected !!