Prabhas Fan

आदिपुरूष चित्रपटाबाबत निगेटिव्ह प्रतिक्रिया देणाऱ्या व्यक्तीला प्रभासच्या फॅननं थिएटरबाहेर धू धू धुतला

673 0

मुंबई : अभिनेता प्रभास आणि कृती सेननची प्रमुख भूमिका असलेला आदिपुरूष हा सिनेमा आज रिलीज झाला. संपूर्ण देशातील प्रेक्षक या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत होते. आज देशभरात सिनेमा रिलीज होताच प्रेक्षकांनी चांगला प्रतिसाद दिला. यानंतर सिनेमा पाहून आलेल्या प्रेक्षकांनी सिनेमाप्रती काही प्रतिक्रिया दिल्या. सोशल मीडियावर प्रेक्षकांच्या प्रतिक्रिया मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत. सध्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होताना दिसत आहे यामध्ये थिएटर बाहेर सिनेमाचा रिव्ह्यू देणाऱ्या एका व्यक्तीला आजूबाजूच्या लोकांनी धु धु धुतला आहे.

काय आहे नेमके प्रकरण?
आदिपुरूष सिनेमा पाहून आल्यानंतर प्रेक्षकांच्या खऱ्या प्रतिक्रिया समोर येताना दिसत आहेत. असाच एक प्रेक्षक हैद्रबाद येथून सिनेमा पाहून बाहेर आल्यानंतर त्याचा खरा रिव्ह्यू सांगत असताना तिथे प्रभासचा एक फॅन येतो. रिव्ह्यू देत असलेल्या त्या व्यक्तीला थांबवतो आणि पुढे त्या दोघांमध्ये बाचाबाची सुरू होते. सिनेमा पाहून आलेले आणि पाहण्यासाठी जाणारे प्रेक्षक यांची भांडणं पाहण्यासाठी एकच गर्दी करतात. दोघांची सिनेमाच्या रिव्ह्यूवरून झालेली बाचाबाची इतकी वाढते की रिव्ह्यू देणाऱ्या त्या व्यक्तीला सगळे मिळून धू धू धूतात. त्याच्या पोटात आणि पाठीत बुक्के मारून त्याला जमिनीवर पाडतात.

त्या व्यक्तीने काय दिला रिव्ह्यू?
‘खऱ्या रामायणाची वाट लावण्यात आली’, ‘प्रभासमध्ये बाहुबली वाला प्रभास दिसतोय’. त्याचप्रमाणे ‘सगळी पात्र टपोरी भाषा बोलत आहेत’, ‘सिनेमा पाहून चुकी केली, पैसै वाया गेले’, अशा प्रकारचे रिव्ह्यू प्रेक्षकांनी थिएटर बाहेर येताच दिले आहेत. एवढेच नाहीतर रामानंद सागर यांच्या रामायणाशी आदिपुरूषची तुलना करण्यात आली आहे. त्यामुळे आता इतक्या ट्रोलिंग आणि निगेटिव्ह रिव्ह्यूनंतर आदिपुरूष सिनेमा फार काळ थिएटरमध्ये टिकणार का ? हे काही दिवसांत कळेल.

Share This News
error: Content is protected !!