PHOTO : अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा अपघात म्हणाली , ” दुवाओ मे याद रखियेगा “…!

727 0

मुंबई : बॉलीवूडची प्रसिद्ध अभिनेत्री शिल्पा शेट्टी हिचा अपघात झाल्याची माहिती मिळते आहे . शिल्पाने स्वतः तिच्या अकाउंट वरून तिच्या अपघाताविषयी माहिती दिली आहे. या अपघातामध्ये तिचा पाय फ्रॅक्चर झाला असल्याचे दिसून येते आहे .तिच्या हाताला देखील किरकोळ दुखापत झाली असल्याचे लक्षात येते आहे .

तिने ट्विटरवर शेअर केलेल्या तिच्या फोटोमध्ये मात्र अपघात होऊ देखील ती पॉझिटिव्ह असल्याचे दिसून येते आहे . व्हीलचेअरवर बसलेल्या शिल्पाने चेहऱ्यावर हास्य ठेवून एक फोटो शेअर केला आहे . आणि त्यास कॅप्शन दिले आहे की , ” रोल, कॅमेरा ,ॲक्शन… ब्रेक अ लेग ” कॅप्शन मध्ये देखील ती पॉझिटिव्ह असल्याचे दिसून येते आहे . तसेच पुढचे सहा आठवडे ती शूटिंग करू शकणार नाही . तोपर्यंत “दुवा मे याद रखियेगा , प्रार्थना नेहमीच मदतीला येते असे देखील तिने कॅप्शन मध्ये म्हटल आहे.

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!