मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री म्हणजे हेमांगी कवी कलाविश्वात सक्रीय असण्यासोबतच हेमांगी सोशल मीडियावरही चांगलीच अॅक्टीव्ह आहे.
त्यामुळे समाजात घडणाऱ्या प्रत्येक घटनेवर ती उघडपणे व्यक्त होत असते. यात अनेकदा ती बेधडकपणे तिची मतंही मांडते. त्यामुळे नेटकऱ्यांमध्ये तिची कायम चर्चा रंगत असते.
सध्या सोशल मीडियावर हेमांगीची एक पोस्ट व्हायरल होतोय. हेमांगीने ही पोस्ट खास महिला दिनाचं औचित्य साधत लिहिली आहे.
काय आहे हेमांगी कवीची इंस्टाग्राम पोस्ट
२०२१ साल माझ्यासाठी महत्वाचं ठरलं! कलाकार म्हणून काही महत्वाच्या projects मध्ये माझी वर्णी लागली जे २०२२ मध्ये तुमच्या समोर येईलच पण एक बाई म्हणून जास्त महत्वाचं ठरलं! या आधी ही मी माझ्या आकलनशक्ती नुसार एक व्यक्ती म्हणून अनेक वेळा व्यक्त झालेय पण २०२१ माझ्यासाठी नक्कीच खास ठरलं आणि ते खास झालं तुमच्यामुळे. एकीकडे काही लोकांनी मला झिडकारलं, फटकारलं, खूप खालच्या पातळीला जाऊन हिणवलं (आज ही ते चालूच आहे), काहींनी साथ सोडली, मैत्रीण म्हणून ही नकोच म्हणून लांब केलं, काही लोकांनी तर माझी इतर ओळख त्यांना माहीत असताना देखील ‘ही तीच ना… बाई, बुब्स वाली बाई’ हीच माझी एकमेव ओळख म्हणून मुद्दाम माझ्यावर लादायच काम केलं, ofcourse मला माझ्या या नवीन ओळखीचा अभिमानच आहे कारण त्यामुळे का होईना बाईला जाचक ठरणाऱ्या पुरुषप्रधान मानसिकतेला (या मानसिकतेत बाई आणि पुरुष दोन्ही येतात) जोरदार हादरे बसले आणि विचार करायला भाग पाडलं तर दुसरीकडे..
https://www.instagram.com/p/Ca1J_xatEs1/?utm_medium=copy_link
काहींनी मला खूप मनापासून स्वीकारलं, काहींनी छुपा का होईना मला पाठिंबा दर्शवला, खूप छान आणि नवनवीन लोकं जोडली गेली, काही जाणत्या लोकांनी भरभरून कौतुक केलं, काहींनी आत्माविश्वास वाढवला तर काहींनी मला चक्क inspiration च मानलं! बाप रे! Rollercoster ride का काय म्हणतात ना तसलं काहीसं ठरलं हे वर्ष! पण या सगळ्या चांगल्या वाईट अनुभवातून मी बाई म्हणून आतून बाहेरून अधिकाधिक उजळत गेले. स्वतःला जास्तीत जास्त सापडत गेले. थोडक्यात happy होत गेले ☺️ आणि आज तोच रोजचा आनंद साजरा करण्यासाठीचा खास दिवस! त्यासाठी मी तुम्हां सर्वांचे आजच्या जागतिक महिला दिवशी मनापासून आभार मानते आणि शुभेच्छा ही देते! असं या पोस्टमध्ये हेमांगीने लिहिले आहे. हेमांगीच्या चाहत्यांनी तिची ही पोस्ट लाईक करत तिला महिला दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. सध्या हेमांगी कर्लस मराठीवरील लेक माझी दुर्गा या मालिकेत मुख्य भूमिकेत दिसतेय.