Nitin Desai

Nitin Desai : नितीन देसाई आत्महत्या प्रकरणात 5 जणांविरोधात गुन्हा दाखल

762 0

मुंबई : बॉलीवूडचे प्रसिद्ध कला दिग्दर्शक नितीन देसाई (Nitin Desai) यांनी 2 ऑगस्ट रोजी गळफास घेऊन आत्महत्या केली होती. या घटनेमुळे संपूर्ण चित्रपटसृष्टीमध्ये मोठी खळबळ उडाली होती. आता या आत्महत्या प्रकरणात एक मोठी अपडेट समोर आली आहे. याप्रकरणी 5 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नितीन (Nitin Desai) यांच्या पत्नी नेहा देसाई यांनी खालापूर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. या तक्रारीच्या आधारे खालापूर पोलीस ठाण्यात पहिला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या प्रकरणी इ सी एल फायनान्स कंपनी व एडलवाईज ग्रुपचे पदाधिकारी अशा एकूण 5 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कर्ज प्रकरणात वारंवार तगादा लावून आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पोलिसांनी हा गुन्हा दाखल केला आहे. या 5 जणांविरोधात कलम 306, 34 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Share This News
error: Content is protected !!