Nitin Desai

Nitin Desai : सुप्रसिद्ध कला दिग्दर्शक नितीन देसाई यांची गळफास घेऊन आत्महत्या

443 0

मुंबई : सुप्रसिद्ध कला दिग्दर्शक नितीन देसाई (Nitin Desai) यांनी आज सकाळी कर्जतमधील एनडी स्टुडीओमध्ये गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. या घटनेमुळे हिंदी आणि मराठी सिनेसृष्टीमध्ये मोठी खळबळ उडाली आहे. वयाच्या 58 व्या वर्षी त्यांनी आपल्या आयुष्याचा शेवट केला आहे. नितिन देसाई (Nitin Desai) हे लोकप्रिय कलादिग्दर्शक असण्यासोबत निर्माता दिग्दर्शक आणि अभिनेतेदेखील होते.

नितिन देसाई यांनी आपल्या कारकिर्दीत अनेक सुपरहिट हिंदी सिनेमांचे सेट उभारले होते.’1942 अ लव्ह स्टोरी’, ‘हम दिल दे चुके सनम’, ‘माचिस’, ‘देवदास’, ‘लगान’, ‘जोधा अकबर’ या सुपरहिट सिनेमाचं त्यांनी कला दिग्दर्शन केलं होतं. नितिन देसाई हे मराठी आणि हिंदी सिनेसृष्टीतले खूप मोठे नाव होते. 80 च्या दशकात नितीन नितिश देसाई यांनी आपल्या करिअरची सुरुवात केली होती.

‘1942 अ लव्ह स्टोरी’ या सिनेमाने नितिन देसाई (Nitin Desai) यांना खऱ्या अर्थाने ब्रेक मिळाला होता. पुढे अनेक लोकप्रिय दिग्दर्शकांसोबत त्यांनी काम केलं.गेल्या 30 वर्षांतल्या अनेक सिनेमांच्या कलादिग्दर्शनाची धुरा नितिन देसाई यांनी सांभाळली आहे.

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!