Gargi Phule

अभिनेत्री गार्गी फुलेची राजकारणात एंट्री; ‘या’ पक्षात केला प्रवेश

1344 0

मुंबई : अभिनयक्षेत्र आणि राजकारण यांचे फार जुने नाते आहे. अनेक अभिनेते अभिनेत्री राजकरणात प्रवेश करताना दिसतात.मागच्या काही महिन्यांपूर्वी मराठी अभिनेत्री प्रिया बेर्डे यांनी भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केला होता. यानंतर आता प्रसिद्ध मराठी अभिनेते निळू फुले यांची मुलगी आणि अभिनेत्री गार्गी फुले यांनीदेखील राजकारणात प्रवेश केला आहे. त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला आहे.

ज्येष्ठ सिने अभिनेते स्वर्गीय निळू फुले यांची मुलगी आणि अभिनेत्री असलेली गार्गी फुले (Gargi Phule) यांचा आज राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये जाहीर प्रवेश केला आहे. यावेळी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil), विधानसभेचे विरोधी पक्ष नेते अजित पवार (Ajit Pawar) यांच्या उपस्थितीत हा प्रवेश सोहळा पार पडला. प्रवेश करताना गार्गी फुले म्हणाल्या, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा सर्व समाज स्तरावर काम करणारा असल्यामुळे विशेषतः महिलांसाठी काम करत असल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश घेतला आहे. तरुणांनी किनाऱ्यावर न बसता राजकारणात यावं असं म्हणतात त्यामुळे मी राजकारणात आले. यानंतर पक्ष जी जबाबदारी देईल ती मी घेईल असेदेखील त्या म्हणाल्या.

कोण आहे गार्गी फुले?
गार्गी फुले या ज्येष्ठ सिने अभिनेते स्वर्गीय निळू फुले (Nilu Phule) यांची मुलगी आहे. गार्गी फुले यांनी B. A., M. A.in Women Liberation या विषयात पदवी घेतली आहे. 1998 पासून त्या प्रायोगिक नाट्य चळवळीशी संबंधित आहेत. तर सत्यदेव दुबे त्यांच्या त्या शिष्याही आहेत. समन्वय या नाट्यसंस्थेसह अनेक प्रायोगिक नाटकात गार्गी फुले यांनी आपल्या अभिनयाची छाप सोडली आहे. गार्गी फुले यांनी आतापर्यंत मळभ, कोवळी उन्हे , श्रीमंत , सोनाटा, वासंसी जीर्णनी, सुदामा के चावल, या नाटकांमध्ये काम केले आहे. तसेच त्यांनी राजा राणी ची गं जोडी, सुंदरा मनामध्ये भरली, तुला पाहते रे, कट्टी बट्टी या मालिकांमधून त्यांनी आपल्या अभिनयाची छाप सोडली आहे. आता गार्गी फुले यांनी राजकारणात प्रवेश केल्याने त्या याठिकाणी आपली छाप सोडतात का ते पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

Share This News
error: Content is protected !!