मराठमोळ्या सोनल काळेनी जिंकला ‘मिस आशिया ग्रेट ब्रिटन’चा किताब
मुंबई : मराठमोळी मुंबईकर (Mumbai) असलेल्या सोनलने (Sonal Kale) साता समुद्रा पार आपल्या भारताचा झेंडा रोवला आहे. तिने ‘मिस आशिया ग्रेट ब्रिटन’चा (MRS. Asia Great Britain) किताब जिंकला आहे. ही भारतीयांसाठी मोठी आनंदाची बाब आहे. सोनलने सोशल मीडियावर याबद्दलची खास पोस्ट शेअर करून याची माहिती दिली आहे.
काय लिहिले आहे पोस्टमध्ये ?
“नमस्कार… मी सोनल काळे… बॉलिवूडची कोरिओग्राफर असण्यासोबत सोशल मीडिया इन्फ्लुअंसरदेखील आहे. कंटेट क्रिएट करण्याची मला आवड आहे. मी जन्माने भारतीय आहे. मनाने महाराष्ट्रीअन आहे तर राहायला परदेशात आहे. मी गुजराती व्यक्तीसोबत लग्न केलं आहे. मला महाराष्ट्राचा आणि गुजरातचा अभिमान आहे. एक नवीन संस्कृती आत्मसात करायला मला आवडतं”. तसेच सोनलने पुढे लिहिलं की, “मिळालेल्या संधीचं मी सोनं केलं आहे. आता माझ्या स्वप्नांना मी सत्यात उतरवलं आहे. या स्पर्धेने आता मला एक वेगळा आत्मविश्वास दिला आहे. आता मला माझं व्यक्तिमत्त्व अधिक प्रभावशाली करायचं आहे. तसेच नवोदितांचा आत्मविश्वास वाढेल यासाठी प्रयत्न करायचा आहे. नव्या आव्हानांचा सामना करण्यासाठी मी त्यांना मदत करेल. मानसिक आरोग्याबद्दल जनजागृती पसरवण्यासाठी मी मदत करेल”. असे सोनल म्हणाली आहे.
कोण आहे सोनल काळे?
सोनलचा जन्म महाराष्ट्रातील मराठी कुटुंबात झाला. त्यानंतर उच्च शिक्षणासाठी ती लंडनला गेली. तेथील एका गुजराती व्यक्तीसोबत तिने लग्न केलं. आता तिचे आई-वडील मुंबईत राहत असून त्यांना आपल्या लेकीचा अभिमान आहे. सोनल ही एक इन्फ्लुएंसर, फ्रीस्टाइल बॉलिवूड (Bollywood) कोरिओग्राफर आणि कंटेन्ट क्रिएटर आहे. सोनल सोशल मीडियावर खूप अॅक्टिव्ह आहे. ‘चायवाली लडकी’ म्हणून ती प्रचंड लोकप्रिय आहे.
