aadipurush Show

आदिपुरुषचा शो सुरु असताना साक्षात हनुमान प्रकटले

1583 0

मुंबई : बहुचर्चित आदिपुरूष हा सिनेमा अखेर आज संपूर्ण देशभरात प्रदर्शित झाला. या सिनेमाने रिलीज होण्याआधीच कोटींची कमाई केली आहे. पहिल्याच दिवशी प्रेक्षकांनी हा चित्रपट पाहण्यासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी केली. सध्या सोशल मीडियावर आदिपुरुषचा शो सुरु असतानाचा एक व्हिडिओ व्हायरल होताना दिसत आहे.

काय आहे व्हिडिओमध्ये?
आदिपुरूषच सिनेमाचा सकाळचा पहिला शो सुरू आहे. स्क्रिनवर प्रभू श्रीरामांच्या रुपात प्रभासची एंट्री झाली आहे आणि अचानक थिएटरच्या एका खिडकीतून एक माकड डोकावून पाहताना दिसत आहे. प्रेक्षकांनी त्या माडकावर लाईट मारून त्याचा व्हिडिओ शूट केला आहे. सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

थिएटरमध्ये माकडानं एंट्री घेताच उपस्थित प्रेक्षकांनी जय श्रीराम जय श्रीराम हे गाणं म्हणण्यास सुरू केली. गाणं ऐकत खिडकीतील माकड देखील प्रेक्षकांकडे तर कधी स्क्रीनवर दिसत असलेल्या श्रीरामांकडे पाहात होतं. या व्हिडिओवर अनेकांनी कमेंट करायला सुरुवात केली आहे. प्रभासचा सिनेमा हिट होईल कारण पहिल्याच दिवशी हनुमानानं एंट्री घेऊन सिनेमाला आशिर्वाद दिल्याचे कमेंटमध्ये म्हंटल आहे.

Share This News
error: Content is protected !!