Sienna Weir

‘मिस युनिव्हर्स’ सिएनाचे अपघात निधन; वयाच्या 23 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

694 0

मुंबई : ‘मिस युनिव्हर्स 2022’मध्ये (Miss Universe 2022) आपल्या सौंदर्याचा जलवा दाखवणारी मॉडेल सीएना वीरचे (Sienna Weir) वयाच्या 23 व्या वर्षी अपघाती निधन झालं आहे. ऑस्ट्रेलियामध्ये घोडेस्वारी करत असताना हा अपघात झाला. तिला उपचारासाठी तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचारदरम्यान तिचा मृत्यू झाला.

https://www.instagram.com/p/Cn0VZXRh31n/?utm_source=ig_embed&ig_rid=1b883885-573c-405b-8f8e-87d0f758f3c6

कसा घडला अपघात?
2 एप्रिल रोजी सिएना ऑस्ट्रेलियातील विंडसर पोलो मैदानात घोडेस्वारी करत होती. यादरम्यान ती तोल जाऊन घोड्यावरून खाली पडली आणि तिला गंभीर दुखापत झाली. यानंतर तिला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. मागच्या काही दिवसांपासून तिच्यावर उपचार सुरु होते. तिला डॉक्टरांच्या नियंत्रणाखाली ठेवण्यात आले होते. मात्र अखेर आज तिची उपचारादरम्यान प्राणज्योत मावळली.

https://twitter.com/Hectorveyssiere/status/1654680725692600321

कोण आहे मॉडेल सीएना वीर?
सिएना एक मॉडेल आहे. मॉडेलिंग क्षेत्रात तिने स्वतःची एक ओळख निर्माण केली होती. तिने आपल्या सौंदर्याने चाहत्यांना भूरळ पाडली होती. अल्पावधीतच लोकप्रिय झालेल्या मॉडेल्समध्ये सिएनाची गणना केली जाते. ‘मिस युनिव्हर्स 2022’ या स्पर्धेत सिएना शेवटच्या टप्प्यात पोहोचली होती. तिने सिडनीच्या विद्यापीठातून तिने इंग्रजी साहित्य आणि मनोविज्ञान या विषयांत पदवीचं शिक्षण घेतलं होते. ती सोशल मीडियावर नेहमीच अ‍ॅक्टिव्ह असायची. तिने जगभरातील अनेक फॅशन शोमध्ये आपला सहभाग घेतला होता.

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!