Milind Safai

Milind Safai Pass Away : जेष्ठ अभिनेते मिलींद सफई यांचे निधन

911 0

मुंबई : जेष्ठ अभिनेते मिलिंद सफाई यांचे नुकतंच निधन (Milind Safai Pass Away) झालं आहे. मिलींद हे एक प्रसिद्ध मराठी अभनेता होते. मिलिंद सफाई यांनी अनेक मराठी चित्रपटांमध्ये महत्वपूर्ण भूमिका साकारल्या आहेत. मिलिंद सफई यांच्या निधनाचं वृत्त समजताच संपूर्ण मनोरंजन सृष्टीवर शोककळा पसरली आहे. मराठीसोबतच मिलींद यांनी हिंदी कलाविश्वातही महत्त्वपूर्ण योगदान दिलं.

अनेक मालिकांमधून त्यांनी आपल्या अभिनयाचं कौशल्य सिद्ध केलं आहे. सिनेसृष्टीतून त्यांच्या जाण्याने हळहळ व्यक्त केली जात आहे. त्यांचे नेमके कशामुळे निधन झाले हे अद्याप समजू शकलेले नाही. मेकअप, थँक यू विठ्ठला, पोस्टर बॉय, छडी लागे छम छम, प्रेमाची गोष्ट, टार्गेट आदी अनेक मराठी चित्रपटांत काम केले होते. याशिवाय आई कुठे काय करते, आशिर्वाद तुझा एकविरा आई, सांग तू आहेस का, 100 डेज, पुढचं पाऊल या मालिकांतही त्यांनी काम केले होते.

Share This News
error: Content is protected !!