Pravin Raja Karale

Pravin Raja Karale Pass Away : प्रसिद्ध दिग्दर्शक प्रवीण कारळे यांचे निधन

1055 0

मुंबई : मागच्या काही महिन्यांपासून मराठी मनोरंजन विश्वातले अनेक मोठ्या कलाकारांनी जगाचा निरोप घेतला आहे. ज्येष्ठ अभिनेत्री आशा तांबे आणि सुलोचना दीदी यांचं काही दिवसांपूर्वी निधन झाले हि घटना ताजी असताना आता मनोरंजन विश्वातल्या अजून एका कलाकाराने जगाचा निरोप घेतला (Pravin Raja Karale Pass Away) आहे. या कलाकाराचे नाव आहे प्रवीण राजा कारळे.

ते एक प्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक होते. त्यांच्या अचानक जाण्यामुळे मनोरंजन सृष्टीमध्ये एक पोकळी निर्माण झाली आहे. प्रवीण कारळे यांनी आज (23 जून) सकाळी दहा वाजता पुण्यातील मंगेशकर रुग्णालयात शेवटचा श्वास घेतला. प्रवीण कारळे हे सुप्रसिद्ध नाट्य आणि चित्रपट समीक्षक राजा कारळे यांचे चिरंजीव होते.

Subhedaar Movie Teaser : शिवराज अष्टकातील पाचवे अष्टक लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला; ओम राऊतच्या तान्हाजीला देणार टक्कर ?

प्रवीण राजा कारळे यांनी वयाच्या अवघ्या चौथ्या वर्षी त्यांनी रंगभूमीवर पदार्पण केले होते. अगदी लहानपणापासूनच त्यांनी चित्रपटसृष्टीतील बारकावे समजून घेतले होते. त्यांचे ‘बोकड’, ‘भैरू पैलवान की जय’, ‘मानसन्मान’, ‘माझी आशिकी’, ‘हृदयात समथिंग समथिंग’ हे चित्रपट मोठ्या प्रमाणात गाजले होते. त्यांच्या अशा अचानक जाण्याने मनोरंजन विश्वावर शोककळा पसरली आहे.

Share This News
error: Content is protected !!