Prajakta Mali

Prajakta Mali : प्राजक्ता माळीने केले स्वप्न साकार; पुण्यातील घरानंतर आता मुंबईजवळ खरेदी केले फार्महाऊस

1145 0

मुंबई : मराठमोळी अभिनेत्री प्राजक्ता माळी (Prajakta Mali) हीची गणना लोकप्रिय अभिनेत्रींमध्ये केली जाते. प्राजक्ताने (Prajakta Mali) अभिनयाच्या जोरावर प्रेक्षकांच्या मनात एक वेगळे स्थान निर्माण केलं आहे. ‘जुळून येती रेशीमगाठी’, ‘नकटीच्या लग्नाला यायचं हं’ यांसारख्या प्रसिद्ध मालिकेतून प्राजक्ताने लोकांच्या मनात घर केले आहे. मागच्या काही वर्षांपासून ती ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या कार्यक्रमाच्या सूत्रसंचालनाची धुरा सांभाळत आहे. त्यानंतर आता प्राजक्ताचे आणखी एक स्वप्न पूर्ण झाले आहे.

काय आहे ते स्वप्न?
प्राजक्ता माळी (Prajakta Mali) ही सध्या करिअरबरोबरच वैयक्तिक आयुष्यात उंच भरारी घेताना दिसत आहे. प्राजक्ता माळीने काही दिवसांपूर्वी पुण्यात नवीन घर खरेदी केलं होतं. त्यानतंर आता प्राजक्ताने फार्म हाऊस खरेदी केले आहे. प्राजक्ताचे हे फार्महाऊस कर्जतमध्ये डोंगराच्या कुशीत आणि निसर्गाच्या सानिध्यात वसलेले आहे.

प्राजक्ताने (Prajakta Mali) नुकतंच या फार्महाऊसचे सुंदर फोटो पोस्ट केले आहेत. यात ती तिच्या फार्महाऊसच्या बाहेर उभी असल्याचे दिसत आहे. या फोटोला कॅप्शन देताना याबद्दल माहिती दिली आहे. सध्या तिची ही पोस्ट मोठ्या प्रमाणात व्हायरल होताना दिसत आहे.

Share This News
error: Content is protected !!
WhatsApp

WhatsApp

1
Join Us On WhatsApp 😊.
Hide