Swapnil Joshi

Ajit Pawar : राजकीय भूकंपानंतर स्वप्नील जोशीचे ‘ते’ ट्वीट मोठ्या प्रमाणात चर्चेत

909 0

मुंबई : काल महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी उलथापालथ पाहायला मिळाली. अजित पवार (Ajit Pawar) यांनी काही आमदारांसह बंड केल्याने राष्ट्रवादीमध्ये मोठी फूट पडली. काल पार पडलेल्या शपथविधीमध्ये अजित पवार (Ajit Pawar) यांच्यासोबत छगन भुजबळ, दिलीप वळसे पाटील, धनंजय मुंडे, हसन मुश्रीफ, धर्मराव अत्राम, आदिती तटकरे, संजय बनसोडे आणि अनिल भाईदास पाटील यांनीदेखील मंत्री पदाची शपथ घेतली आहे. या सगळ्या घडामोडींवर आता मनोरंजन विश्वातील कलाकार आपली प्रतिक्रिया देताना दिसत आहेत. काल तेजस्विनी पंडित यांचे ट्विट व्हायरल झाले होते त्यानंतर आता मराठमोळा अभिनेता स्वप्नील जोशीचे ट्विट व्हायरल होत आहे.

Ajit Pawar : अजित पवारांच्या बंडानंतर शरद पवारांकडे किती आमदार शिल्लक ? पहिला आकडा आला समोर

काय आहे ट्विटमध्ये ?
राज्यातील सध्याच्या राजकीय परिस्थिती दरम्यान मराठमोळा अभिनेता स्वप्नील जोशीने ट्वीट केलं आहे. अजित पवारांच्या शपथविधीनंतर केलेल्या ट्वीटमध्ये “उत्तम पटकथा लिहिण्याची कला” असं स्वप्नील जोशी म्हणाला आहे. त्याचं हे ट्वीट सध्याच्या राजकीय परिस्थितीवर असल्याचं नेटकऱ्यांच्या कमेंट्सवरून दिसतंय. मात्र स्वप्निलने ट्वीटमध्ये राजकारणाबद्दल कोणताही उल्लेख केलेला नाही.

Praful Patel : प्रफुल पटेलांची केंद्रीय मंत्रिमंडळात वर्णी ?

महाराष्ट्राच्या राजकारणात रविवारी हाहाकार पाहायला मिळाला. अवघ्या एक तासाच्या आता विरोधी पक्ष नेते असलेले अजित पवार थेट उपमुख्यमंत्री झाले. रविवारचं राजकारण इतक्या जलद गतीने बदललं की, कोणाला काही कळायच्या आत शपथविधीदेखील पार पडला.

Share This News
error: Content is protected !!