Malaika-Arora

मलायका अरोराच्या ‘त्या’ डान्स व्हिडिओवर चाहते झाले घायाळ; काळ्या रंगाच्या साडीवर दिले हॉट मूव्ह्स (Video)

810 0

मुंबई : बॉलीवूड (Bollywood) अभिनेत्री मलायका अरोरा (Malaika Arora) ही कायम ह्या ना त्या कारणामुळे चर्चेत असते. अरबाज खान (Arbaaz Khan) याच्यासोबत घटस्फोट घेतल्यानंतर मलायका अरोरा ही बॉलिवूड अभिनेता अर्जुन कपूरला (Arjun Kapoor) डेट करत आहे. काही दिवसांपूर्वीच मलायका अरोरा हिने अर्जुन कपूर (Arjun Kapoor) याचा एक फोटो सोशल मीडियावर (Social Media) पोस्ट केला होता. या फोटोवरून मलायकाला मोठ्या प्रमाणात ट्रोल करण्यात आले होते.

यानंतर मलायका सध्या एका वेगळ्या व्हिडिओमुळे चर्चेत आहे. या व्हिडीओमध्ये मलायका अरोरा ही धमाकेदार डान्स करताना दिसत आहे. यामध्ये मलायका काही हॉट मूव्ह्स (Hot Moves) करताना दिसत आहे. काळ्या रंगाच्या साडीवर मलायका अरोरा हिचा अत्यंत बोल्ड लूक दिसत आहे. हा व्हिडिओ खूप जुना आहे मात्र सध्या तो सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे.

राम चाहे लीला या गाण्यावर मलायका अरोरा ही डान्स करताना दिसत आहे. मलायका हिचे हे हॉट मूव्ह्स पाहून चाहत्यांना देखील मोठा धक्का बसला. मलायका अरोरा ही सोशल मीडियावर चांगली सक्रिय असून आपल्या चाहत्यांसाठी कायमच बोल्ड फोटो (Bold Photo) शेअर करत असते. मलायका अरोरा हिची सोशल मीडियावर खूप मोठी फॅन फाॅलोइंग आहे.

Share This News
error: Content is protected !!