Kuljit Pal

Kuljit Pal Passed Away: बॉलिवूड अभिनेत्री रेखाला पहिला ब्रेक देणाऱे निर्माते काळाच्या पडद्याआड

495 0

मुंबई : बॉलिवूड चित्रपटसृष्टीतून अजून एक दुःखद बातमी समोर आली आहे. बॉलिवूडचे प्रसिद्ध चित्रपट निर्माते कुलजीत पाल यांचे निधन (Kuljit Pal Passed Away) झाले आहे. 24 जून रोजी मुंबईत त्यांनी अखेरचा श्वास घेतला. मागच्या काही दिवसांपासून ते आजारी होते. अखेर शनिवारी हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचे निधन झाले. ते 90 वर्षांचे होते. त्यांच्या पार्थिवावर (Kuljit Pal Passed Away) 25 जून रोजी दुपारी 12 वाजता सांताक्रूझ स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. त्यांच्या निधनानंतर हिंदी सिनेसृष्टीतून शोक व्यक्त केला जात आहे.

Viral Video : देव तारी त्याला कोण मारी ! एकापाठोपाठ 3 भरधाव गाड्या अंगावरून गेल्या तरी वाचला चिमुकलीचा जीव

कुलजीत पाल यांनी आपल्या कारकिर्दीत ‘अर्थ’, ‘आज’, ‘परमात्मा’, ‘वासना’, ‘दो शिकारी’ आणि ‘आशियाना’ यासारख्या हिट चित्रपटांची निर्मिती केली आहे. कुलजीत पाल यांनीच बॉलिवूड अभिनेत्री रेखाला पहिला ब्रेक दिला होता. तरीही तो चित्रपट रखडला होता. तो चित्रपट कधीच प्रसिद्ध झाला नाही. त्यांनी आपल्या मुलीलाही चित्रपटसृष्टीत लॉन्च केले पण ती अजूनही इंडस्ट्रीत स्ट्रगल करताना दिसत आहे.

25 जून 2023 रोजी कुलजीत पाल यांच्या पार्थिवावर मुंबईतील सांताक्रूझ स्मशानभूमीत दुपारी 12 वाजता अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. अनेक बॉलीवूड कलाकारांनी त्यांच्या जाण्यावर शोक व्यक्त करत त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे.तर 29 जून 2023 रोजी संध्याकाळी 5 ते 6 दरम्यान शोकसभेचे आयोजन करण्यात आले आहे.

Share This News
error: Content is protected !!