कियाराच्या Filmfare Awards 2022 मधील या रेड हॉट लूकने चाहते झाले घायाळ ; पहा PHOTO

286 0

मुंबई : मुंबईमध्ये फिल्मफेअर अवॉर्ड्स 2022 चे आयोजन करण्यात आले होते. बॉलीवूडच्या दिग्गज कलाकारांची उपस्थिती या अवॉर्ड फंक्शनला होती.

कियाराने तिच्या सौंदर्याने चाहत्यांची मने जिंकली. कियाराने परफॉर्म केल्यानंतर अनेकांनी कियाराच्या परफॉर्मचे काैतुक केले.

अनेक अभिनेत्रींनी आपल्या खास अंदाजमध्ये चहात्यांची मने जिंकण्याचा प्रयत्न केला, पण किआराच्या या रेड हॉट लूकने चाहते घायाळ झाले आहेत.

कियारा अडवाणीने लाल रंगाचा हाय स्लिट ड्रेस घातला होता.  कियाराचा हा लूक तिच्या चाहत्यांना खूप आवडला आहे. याचे फोटो आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

या अवॉर्ड फंक्शनसाठी कियाराने एक लॉंग हाय स्लिट ड्रेस घातला होता. तिच्या बांधेसूद आणि नाजूक सौंदर्याला हा लाल रंगाचा ड्रेस खूपच सुंदर दिसत होता. या अवॉर्ड फंक्शनमध्ये कियाराने अनेक फेमस गाण्यांवर देखील डान्स केला .

मुंबईत फिल्मफेअर अवॉर्ड्स 2022 चे मोठ्या थाटामाटात आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला अनेक प्रसिद्ध स्टार्सनी हजेरी लावली. पण कियारा अडवाणीच्या लूककडे सर्वांच्या नजरा होत्या. या डान्स परफॉर्मन्सच्या वेळी तिने घातलेल्या ब्लॅक ड्रेसची देखील जबरदस्त चर्चा बी-टाउन मध्ये रंगली आहे.

कियारा अडवाणीने काळ्या रंगाच्या ड्रेसमध्ये स्टेजवर जबरदस्त डान्स केला. कियाराने बॉलीवूडच्या काही हिट गाण्यांवर डान्स केला.

Share This News
error: Content is protected !!