कपिल शर्मा करतोय फूड डिलिव्हरीचे काम ? हा व्हायरल फोटो पाहा

174 0

सोनी टीवीवरील ‘द कपिल शर्मा शो’ ने लोकप्रियतेचे उच्चांक काबीज केले आहेत. कपिल शर्मा याचे अँकरिंग, धम्माल किस्से यांना दर्शक भरभरून दाद देतात. आपल्या सिनेमाच्या प्रमोशनसाठी बॉलिवूड चे निर्माते ‘द कपिल शर्मा शो’ला प्राधान्य देतात. एवढ्या गाजलेल्या शोचा प्रमुख असलेला कपिल शर्मा फूड डिलिव्हरीचे काम करत असल्याचे समोर आले आहे.

एक फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यामध्ये कपिल शर्मा ऑरेंज टीशर्ट घालून एका बाईकवर बसलेला असून त्याच्या पाठीला फूड डिलिव्हरी करण्याची बॅग दिसून येत आहे. हा फोटो बघितल्यानंतर काही सेकंदांसाठी तो इसम कपिल शर्मा असल्याचे जाणवते. मात्र तसे नाही. कपिल शर्माच्या एका चाहत्याने हा फोटो ट्विटरवर पोस्ट केला आहे. कपिलला टॅग करुन पोस्ट करत असं म्हटलं आहे, ‘सरजी आज मी तुम्हाला लाइव्ह बघितलं.’ कपिल शर्माने सर्वांना होळीच्या शुभेच्छा देणारी पोस्ट ट्विटरवर केली होती. त्यावर रिप्लाय देताना चाहत्याने हा फोटो पोस्ट केला आहे.

दरम्यान या ट्विटर युजरच्या पोस्टवर स्वत: कपिल शर्माने देखील कमेंट केली आहे. त्याने त्याच्या मजेदार शैलीत उत्तर देत असं म्हटलं आहे की, ‘कुणाला सांगू नको.’

Share This News
error: Content is protected !!