मनोरंजन

Kedar Shinde : बाईपण भारी देवा नंतर येतोय ‘आईपण भारी देवा’; केदार शिंदेकडून नव्या सिनेमाची घोषणा

मुंबई : जगभरात आज जागतिक महिला दिन साजरा केला जात आहे. याच दिवसाचे औचित्य साधून दिग्दर्शक केदार शिंदे (Kedar Shinde) यांनी त्यांच्या नव्या सिनेमाची घोषणा केली आहे. 2023 या वर्षात त्यांचा बाईपण भारी देवा हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला आला. सिनेमानं प्रेक्षकांची मनं जिंकलीच आणि बॉक्स ऑफिसवर देखील नवा रेकॉर्ड तयार केला. बाईपण भारी देवा नंतर आता केदार शिंदे दिग्दर्शित आईपण भारी देवा हा नवा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

केदार शिंदे यांनी केली पोस्ट
केदार शिंदे यांनी आईपण भारी देवा या सिनेमाचं पहिलं पोस्टर रिलीज केलं आहे. सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत त्यांनी नव्या सिनेमाची घोषणा केली आहे. “… कारण प्रत्येकाला आई असते” अशी बायलाईन घेऊन आईपण भारी देवा हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. “प्रत्येक घरातल्या बाईपणाच्या भारी गोष्टीनंतर दिग्दर्शक केदार शिंदे आणि जिओ स्टुडिओज घेऊन येत आहेत. प्रत्येक घरातल्या आईपणाची भारी गोष्ट ‘आईपण भारी देवा’”, अशी खास पोस्ट केदार शिंदे यांनी शेअर केली आहे.

https://www.instagram.com/p/C4PUuuLKgbB/?utm_source=ig_embed&ig_rid=469b1908-76ab-4eb9-b62f-cc5073451e2a

महिलांच्या दररोजच्या जगण्यातील गोष्टी, त्यांची सहनशक्ती हे सगळं बाईपण भारी देवा या सिनेमात दाखवण्यात आलं. त्यानंतर बाईच्या आयुष्यातील सर्वात मोठी गोष्ट असते ती म्हणजे तिचं आई होणं, हे आईपण या सिनेमातून दाखवण्यात येणार आहे. या पोस्टमध्ये केदार शिंदे यांनी आईपण भारी सिनेमाची घोषणा करताना सिनेमाच्या रिलीजची देखील माहिती दिली आहे. आईपण भारी देवा हा सिनेमा 2025 मध्ये प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

TOP NEWS MARATHI : जागतिक महिला दिन विशेष: कसा आहे अभिनेत्री मधुरा वेलणकरांचा प्रवास; पाहा… विशेष मुलाखत

 

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

Dolly Sohi : ‘हिटलर दीदी’ फेम अभिनेत्री डॉली सोही हिचं निधन

Mahashivratri : महाशिवरात्रीच्या निमिताने जाणून घेऊया भारतातील शंकराच्या 12 ज्योतिर्लिंगांबद्दल

Women’s Day Special : आज महिला दिनाच्या निमित्त महिलांच्या अधिकारांबद्दल जाणून घेऊया

Virabhadrasana : वीरभद्रासन म्हणजे काय? त्याचे काय आहेत फायदे?