‘Kaali’ poster controversy : दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांची लीना मणिमेकलाई यांच्यावर थेट टीका म्हणाले ‘वेडी’…

266 0

मुंबई : काली या चित्रपटाचे पोस्टर प्रसिद्ध करण्यात आले आणि त्यानंतर या चित्रपटाच्या दिग्दर्शिका लीना मणिमेकलाई चांगल्याच वादाच्या भोवऱ्यात अडकली आहे.या पोस्टरवर अनेक कलाकार आणि सोशल मिडिया युझर्सने देखील नाराजी व्यक्त केली असताना, लीनावर कायदेशीर कारवाई देखील करण्यात येत आहे.
तिच्यावर अनेक एफआरआय सुद्धा दाखल करण्यात आले आहेत. तर दिल्ली न्यायालयाने तिला ६ ऑगस्ट रोजी हजर राहण्याचे समन्स देखील बजावले आहेत. आता या सर्व वादविवादामध्ये ‘द कश्मीर फाइल्स’ सारख्या विवादित चित्रपटाचे दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांनी देखील उडी घेतली आहे.

तुम्हाला सांगू इच्छिते की,लीना आपल्या काली या डॉक्युमेंट्रीच्या पोस्टर विषयी समर्थनकारक भाष्य करताना म्हणाले की,”माझी काली ही डॉक्युमेंटरी अनोख्या विषयावर आहे. ती एक मुक्त आत्मा आहे. ती पितृसत्ताक समाजावर भाष्य करते. तर हिंदुत्वाला मोडून काढते. ती भांडवलशाही नष्ट करते. आणि प्रत्येकाला तिच्या हजार हातांनी आलिंगन देते.” असं लीना मणिमेकलाई हिने ट्विट करत म्हंटले आहे.


तिच्या याच ट्विटवर विवेक अग्निहोत्री यांनी ट्विट करून,” कोणी अशा वेड्या लोकांना संपवू शकेल का?” अशी थेट टीका केली आहे.
लीना यांच्या या ‘काली’ नामक डॉक्युमेंटरीमध्ये पोस्टरवर देवी कालीच्या वेशातील अभिनेत्रीच्या हातामध्ये सिगरेट आणि एलजीबीटीचा झेंडा दाखवण्यात आला होता. बऱ्याच विवादानंतर ट्विटरने देखील ही पोस्ट हटवली होती.

Share This News
error: Content is protected !!