जरिया संस्थेकडून वादक अमान आणि अयान अली खान बंगेश यांच्या कार्यक्रमाचे आयोजन – दिपक भानुसे यांचे बासरीवादन

769 0

‘जरिया’ या संस्थेने निधीसंकलनासाठी वादक अमान आणि अयान अली खान बंगेश यांच्या सरोद वादनाचा आणि दिपक भानुसे यांच्या बासरीवादनाचा कार्यक्रम आयोजित केला आहे. या कार्यक्रमातून मिळणाऱ्या निधीतून उत्तम शिक्षण, पोषक आहार, वैद्यकिय प्रथमोपचार, कौशल्यविकास कार्यक्रम असे काही उपक्रम राबविण्यात येणार आहेत.

हा कार्यक्रम 26 फेब्रुवारीला सायं. 6:30 ते 9:30 या वेळात अॅमनोरा टाऊन पार्क येथे संपन्न होईल.  गरजवंत व्यक्ति आणि दानशूर व्यक्ति यांच्यामधील दुवा म्हणजे ‘जरिया’! असं म्हणतात की, ‘दान करताना एका हाताचं दुसऱ्या हातालाही कळू नये…’ त्यामुळे या दोन हातांमधील दुवा होण्याचं काम जरिया ही एनजीओ करत आहेत. समाजातील प्रतिकूल आर्थिक परिस्थिती असणारे घटक, ऑटिस्टिक मुलं, एचआयव्हीग्रस्त रूग्ण, टाईप 1 मधुमेह रूग्ण अशा काही लोकांसाठी काम करणाऱ्या जरिया या संस्थेने निधीसंकलनासाठी एका कार्यक्रमाचे आयोजन केले आहे.

जरिया ही संस्था कुंती पवार, अपेक्षा शाह आणि रिचा भन्साळी अगरवाल या तीन मैत्रिणींनी मिळून कोव्हिड काळात 2019 मध्ये सुरू केली. निधीसंकलनाच्या या कार्यक्रमापासून जरिया ही संस्था स्त्रीभ्रूणहत्या थांबवा, एचआयव्हीग्रस्तांना मदत, लहान मुलांमधील टाईप 1 डायबिटीस, मानसिकस्वास्थ्य आणि ऑटिस्टिक रूग्णांसाठी काम करणार आहे.

सदर कार्यक्रमाच्या डोनर पाससाठी संपर्क साधा : +91 70305 08222
अधिक माहितीसाठी आमचे इंस्टाग्राम अकाऊंट : @zariyaindia

Share This News
error: Content is protected !!