Manik Bhide

Manik Bhide : अनेक गायक-गायिकांना घडवणारा आवाज हरपला ! शास्त्रीय गायिका माणिक भिडे यांचं निधन

1013 0

मुंबई : संगीतसृष्टीवर पुन्हा एकदा शोककळा पसरली आहे. ज्येष्ठ शास्त्रीय गायिका माणिक भिडे (Manik Bhide) यांचं आज वृद्धापकाळाने निधन झालं आहे. त्या 88 वर्षांच्या होत्या. माणिक भिडे (Manik Bhide) यांच्या निधनानं शास्त्रीय संगीत क्षेत्रात कधीही न भरून येणारी पोकळी निर्माण झाली आहे. त्यांनी आतापर्यंत अनेक गायक-गायिकांना घडवले आहे. गेल्या काही वर्षेापासून माणिक भिडे यांना पार्किन्सन्स या असाध्य व्याधीनं ग्रासलं होतं. यावर उपचारही सुरू होते. अखेर आज त्यांची प्राणज्योत मालवली आहे.

माणिक भिडे यांच्याविषयी थोडक्यात माहिती
माणिक गोविंद भिडे यांचा 1935 मध्ये कोल्हापूर इथं जन्म झाला. बालवयापासून संगीताची आवड असलेल्या माणिकताईंना आई-वडिलांकडून अभिजात संगीत शिकण्यास प्रोत्साहन मिळालं होतं. जयपूर- अत्रोली घराण्याचे आदयपुरुष उस्ताद अल्लादियाँ खाँ यांचे पुत्र उस्ताद मजी खाँ व भूर्जी खाँ साहेब यांची तालीम लाभलेले मधुकरराव सडोलीकर हे माणिकताईंना गुरू म्हणून लाभले होते. गोविंद भिडे यांच्याशी विवाह होऊन माणिकताई मुंबईस वास्तव्याला आल्या. या काळात सुमारे 15 वर्षे गानसरस्वती किशोरी अमोणकर यांचे शिष्यत्व माणिकताईंनी पत्करुन गानसाधनेतला कळस गाठला होता.

माणिकताईंनी आपल्या कारकिर्दीत अनेक शिष्य घडवले. त्यातील अश्विनी भिडे-देशपांडे या त्यांच्या कन्या. त्याचबरोबर माया धर्माधिकारी, प्रीती तळवलकर, ज्योती काळे, संपदा विपट, गीतीका वर्दे या व अनेक शिष्यांना त्यांनी घडवलं. कलाकर, गुरू व एक व्यक्ती म्हणून माणिक भिडे यांचं सुसंपन्न असं व्यक्तिमत्व होतं. माणिक भिडे यांना अनेक पुरस्कारानं गौरवण्यात आलं होतं. संगीतातील उल्लेखनीय योगदानासाठी त्यांना भारतरत्न पं. भीमसेन जोशी जीवन गौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला होता.

Share This News
error: Content is protected !!