Hardeek Akshaya

Hardeek-Akshaya : रील लाईफ हिरोवर भारी पडला रिअल लाईफ हिरो; राणादा अन् पाठकबाई देखील झाल्या थक्क

7422 0

मुंबई : मराठी टेलिव्हिजवरील प्रसिद्ध चेहरे राणा दा आणि पाठक बाई (Hardeek-Akshaya) यांना तर आपण सगळेच ओळखता. ही जोडीने रिअल लाईफमध्ये एकमेकांसोबत आपली लग्नगाठ बांधली आहे. अभिनेता हार्दिक जोशी अर्थात राणा दा आणि पाठक बाई म्हणजेच अक्षया देवधर यांनी काही महिन्यांआधी लग्न केले. सध्या ते आता दोघेही (Hardeek-Akshaya) एकमेकांबरोबर वेळ घालवताना दिसत असतात. दोघांचं लग्नानंतरचं देवदर्शनही अजूनही सुरू आहे. वेळ मिळेल तसे दोघेही देवदर्शनाला जाताना दिसत आहेत. नुकतेच जेजुरीच्या खंडोबाचे दर्शन घेतले आहे. जेजुरी गडावर खंडोबाचं दर्शन घेतानाचा दोघांचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे.

लग्नानंतर पहिल्यांदा जेजुरीला जाताना नवविवाहीत जोडप्यांनी करायच्या सगळ्या विधी आणि परंपरा दोघांनी यावेळी पार पाडल्या. दोघांचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. मंदिरातील रितीनुसार पहिल्या पाच पायऱ्या नव्या नवरीला नवऱ्यानं उचलून देवळात घेऊन जायचं असतं. त्याप्रमाणे हार्दिकनं देखील लाडक्या बायकोला उचलून घेत गड चढला.यावेळी दोघांच्या चेहऱ्यावरील उत्साह त्यावेळी ओसंडून वाहत होता.

जेजुरी गडावर पोहोचल्यानंतर हार्दीक आणि अक्षयानं (Hardeek-Akshaya) खंडेरायाचं दर्शन घेतलं. सोबत शिवपंडिची दोघांनी जोड्यानं पूजा आणि अभिषेक केला. त्यानंतर जेजुरीची पिढ्यांपिढ्या चालत असलेली खंडोबाची 42 किलोची खंडा तलवार हार्दिकनं एका दमात उचलली. यानंतर देवळातल्या एका सेवकानं ती तलवार तोंडानं तलवार उचलली. हे पाहून राणा दा अन् पाठक बाईदेखील थक्क झाले. हा व्हिडिओ पाहून तुम्हीदेखील हेच म्हणाल रीळ लाईफ हिरोवर भारी पडला रिअल लाईफ हिरो… यावेळी दर्शन घेऊन देवळाबाहेर येताच हार्दिक अक्षयाच्या चाहत्यांनी दोघांबरोबर सेल्फी घेण्यासाठी मोठी गर्दी केली.

Share This News
error: Content is protected !!