Harish Magon

Harish Magon Pass Away : बॉलीवूड अभिनेते हरीश मॅगन यांचे निधन

9482 0

मुंबई : बॉलिवूडमधून अजून एक दुःखद बातमी समोर आली आहे. 70-80च्या दशकात आपल्या अभिनयाच्या जोरावर बॉलिवूडमध्ये आपले वेगळे स्थान निर्माण करणारे अभिनेते हरीश मॅगन यांचं निधन (Harish Magon Pass Away) झालं. 1 जुलै रोजी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. ते 76 वर्षांचे होते. हरीश मॅगन यांनी अमिताभ बच्चन यांच्याबरोबर सहकलाकार म्हणून ‘नमक हलाल’ या सिनेमात काम केले होते. त्यांच्या निधनाने बॉलिवूडवर शोककळा पसरली आहे.

हरीश यांनी ‘गोलमाल’ आणि ‘शहंशाह’ सारख्या प्रसिद्ध सिनेमातही काम केलं आहे. हरीश यांच्या मृत्यूपश्चात त्यांची पत्नी, मुलगा सिद्धार्थ आणि मुलगी आरूषी असा परिवार आहे. त्यांचे निधन नेमके कशामुळे झाले हे अद्याप समजू शकलेले नाही. हरीश हे अनेक काळापासून सिनेसृष्टीपासून दूर होते. असं असलं तरी ते मुंबईत स्वत:ची अभिनय कार्यशाळा चालवत होते.

Ajit Pawar : राजकीय भूकंपानंतर स्वप्नील जोशीचे ‘ते’ ट्वीट मोठ्या प्रमाणात चर्चेत

Praful Patel : प्रफुल पटेलांची केंद्रीय मंत्रिमंडळात वर्णी ?

सिने टीव्ही आर्टिस्ट असोसिएशनच्या ट्विटर हँडलवरून अभिनेते हरीश मॅगन यांच्या निधनाची माहिती देण्यात आली आहे. हरीश मॅगन हे 1988 पासून असोसिएशनचे सदस्य होते. हरीश यांचा जन्म 6 डिसेंबर 1946 साली झाला. त्यांनी FTII मधून अभिनयाचं शिक्षण घेतले होते. त्यांनी ‘चुपके चुपके’, ‘मुक्कदर का सिंकदर’ या चित्रपटात महत्वपूर्ण भूमिका साकारली होती.

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!