Gautami Patil Father Passed Away

Gautami Patil Father Passed Away : गौतमी पाटीलच्या वडिलांचे निधन

1381 0

नृत्यांगणा गौतमी पाटीलच्या (Gautami Patil) वडिलांचे निधन झाले आहे. गौतमीचे वडील तीन-चार दिवसांपूर्वी धुळ्यात बेवारस अवस्थेत सापडले होते. त्यानंतर गौतमीला यासंदर्भात माहिती मिळताच तिने त्यांना पुण्यातील चिंतामणी रुग्णालयात दाखल केले. मात्र काल रात्री उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. गौतमी पाटीलच्या वडिलांचे नाव रवींद्र बाबुराव पाटील असे आहे. त्यांच्या दोन्ही किडन्या आणि लिव्हर निकामी झाले होते. आज त्यांच्यावर धनकवडी येथील स्मशानभूमीमध्ये त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

गौतमीचे वडील धुळ्यात सापडलेले बेवारस अवस्थेत
गौतमी पाटीलचे वडील रवींद्र बाबुराव पाटील हे धुळ्यातील (Dhule) आजळकर नगर भागात मरणासन्नावस्थेत सापडले होते. स्वराज्य फाउंडेशनच्या दुर्गेश चव्हाण यांना एक व्यक्ती मरणासन्नावस्थेत असल्याची माहिती मिळताच त्यांनी त्या व्यक्तीची ओळख पटवण्यासाठी त्यांचा फोटो सोशल मीडियावर शेअर केला. त्यानंतर बेवारस अवस्थेत सापडलेली व्यक्ती हे लोकप्रिय नृत्यांगणा गौतमी पाटीलचे वडील असल्याचे समोर आले होते. गौतमी पाटीलचे आई-वडील एकमेकांपासून काही वर्षांपूर्वी वेगळे झाले होते. तेव्हापासून ते एकटेच राहत होते.

Share This News
error: Content is protected !!