Gadar 2 Teaser

‘दामाद है वो पाकिस्तान का…’; दमदार डायलॉगसह Gadar 2चा Teaser रिलीज

502 0

मुंबई : 2001मध्ये आलेल्या ‘गदर: एक प्रेम कथा’ हा सिनेमाने त्याकाळी धुमाकूळ घातला होता. हा चित्रपट प्रचंड हिट ठरला होता. त्यानंतर आता अभिनेता सनी देओल आणि अमीषा पटेल यांच्या अभिनयानं भरलेला या सिनेमाचा सिक्वेल आता प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. सकिना आणि तारा सिंगची प्रेमकथा आता ‘गदर 2’ पाहायला मिळणार आहे. 11 ऑगस्ट रोजी हा सिनेमा रिलीज होणार आहे. त्याआधी सिनेमाचा पहिला टीझर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे.

काय आहे टीझरमध्ये ?
या टीझरमध्ये तुम्ही पाहू शकता कि, “दामाद है वो पाकिस्तान का, उसे नारियल दो, वनरना दहेजमें पाकिस्तान ले जाएगा” या दमदार डायलॉगने टीझरची सुरुवात होताना दिसत आहे. त्यानंतर सनी देओल तारा सिंगच्या रुपात एंग्री यंगमॅन होऊन लाहोरमध्ये धमाकेदार एंट्री घेतो. यावेळी सनी देओल हँडपंपच्या ऐवजी मोठा कार्ट व्हील घेऊन रागात दुष्मनांशी दोन हात करताना दिसत आहे. “तारा सिंग इज बॅक” असं ठसठशीत शब्द स्क्रिनवर येतात आणि टीझर पुढे सरकतो. ट्रेलरच्या शेवटी तारा सिंग स्मशानभूमीत रडताना दिसतोय आणि मागे सिनेमाचं आयकॉनिक गाणं ‘घर आजा परदेशी…’ वाजताना दिसत आहे.

गदर 2मध्ये तारा सिंग आणि त्याचा मुलगा चरणजीत बाप-लेकाच्या नात्यावर लक्ष केंद्रीत करण्यात येणार आहे. ‘गदर: एक प्रेम कथा’मध्ये दाखवण्यात आलेला छोटा जीत म्हणजेच अभिनेता उत्कर्ष शर्माच गदर 2मध्ये त्यांच्या मुलाची भूमिका साकारणार आहे. उत्कर्ष आता मोठा झाला असून त्याला पुन्हा जीतच्या भूमिकेत पाहण्यासाठी सगळेच उत्सुक आहेत.1971मध्ये झालेल्या भारत-पाकिस्तान युद्धाभोवती फिरणारी ही गोष्ट 20वर्ष पुढे सरकणार आहे. यावेळी तारा सिंग आपली पत्नी सकिना नाही तर मुलाचा जीव वाचवण्यासाठी सीमापार जाताना दिसणार आहे.

Share This News
error: Content is protected !!