Gadar 2 OTT Release

Gadar 2 OTT Release : Gadar 2 ‘या’ दिवशी ओटीटीवर होणार रिलीज

1039 0

बॉलिवूड अभिनेता सनी देओल (Sunny Deol) आणि अमीषा पटेल (Ameesha Patel) यांचा ‘गदर 2’ (Gadar 2) हा सिनेमा सिनेमागृहात धुमाकूळ घालत आहे. अल्पावधीतच या सिनेमाने 300 कोटींचा टप्पा पार केला आहे. ‘गदर 2’ (Gadar 2) या सिनेमाची सिनेप्रेमींमध्ये चांगलीच क्रेझ आहे.

कोणत्या OTT वर रिलीज होणार गदर 2?
गदर 2’चे निर्माते अनिल शर्मा यांनी एका मुलाखतीत म्हटले आहे की,गदर 2 हा दोन महिन्यांनी झी-5 वर रिलीज होणार. सध्या हा चित्रपट OTT वर कधी प्रदर्शित होणार हे अजून स्प्ष्टच नाही. दिवाळीच्या मुहुर्तावर हा सिनेमा ओटीटीवर रिलीज करण्यात येईल अशी शक्यता आहे. ‘गदर 2’ हा सिनेमा ओटीटी प्लॅटफॉर्मवर पाहण्यासाठी प्रेक्षकांना आणखी थोडे दिवस प्रतीक्षा करावी लागणार आहे. पठाण, बाहुबली 2, केजीएफ 2, दंगल, संजू, पीके, टायगर जिंदा है, बजरंगी भाईजान, वॉर या सिनेमांप्रमाणे ‘गदर 2’ हा सिनेमादेखील बॉक्स ऑफिसवर 300 कोटींचा टप्पा पार करेल. ‘गदर 2 बघण्यासाठी चाहते उस्सुक आहेत.

Boxoffice वर गदर 2 ने घातला धुमाकूळ
गदर 2′ या सिनेमाने रिलीजच्या पहिल्या दिवशी 40.1 कोटींची कमाई केली. दुसऱ्या दिवशी 43.08 कोटी, तिसरा दिवस 51.7 कोटी, चौथा दिवस 38.7 कोटी, पाचवा दिवस 55.4 कोटी, सहावा दिवस 32.37 कोटी, सातवा दिवस 23.28 कोटी, आठवा दिवस 20.5 कोटी, नववा दिवस 31.07 कोटी, दहावा दिवस 38.9 कोटी आणि अकराव्या दिवशी 13.5 कोटींची कमाई केली आहे. एकंदरीतच रिलीजच्या 11 दिवसांत आतापर्यंत या सिनेमाने 388.6 कोटींचा गल्ला जमवला आहे.

Share This News
error: Content is protected !!