Gadar 2 Movie

सनी देओल आणि अमीषा पटेलचा गदर 2 रिलीजपूर्वीच अडकला वादाच्या भोवऱ्यात? काय घडले नेमके?

387 0

मुंबई : बॉलीवूड (Bollywood) अभिनेता सनी देओल (Sunny Deol) आणि अमीषा पटेल (Ameesha Patel) यांचा बहुप्रतक्षित गदर 2 या सिनेमाचे (Ghadar 2 Movie) सध्या शुटिंग सुरु आहे. या सिनेमाची प्रेक्षकांना मोठ्या प्रमाणात उत्सुकता लागून राहिली आहे. दरम्यान सनी देओल आणि अमीष पटेल यांचा शूटिंग दरम्यानचा एक व्हिडिओ समोर आला आहे. या व्हिडिओमुळे गदर 2 रिलीजपूर्वीच वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे. या व्हिडीओमध्ये सनी आणि अमीषा गुरूद्वारात रोमँटिक सीन (Romantic Scene) करताना दिसत आहेत.

काय घडले नेमके?
शिरमणि गुरूद्वारा प्रबंधक कमिटीनं (Shiromani Gurdwara Management Committee) या व्हिडिओवर प्रतिक्रिया देत विरोध केला आहे. त्याचप्रमाणे जीपीसी जनरल सेक्रेटरी गुरूचरण सिंह ग्रेवाल यांनी सनी देओल आणि अमीष पटेल यांना चांगलेच खडे बोल सुनावले आहेत. जीपीसीने या घटनेचा तीव्र आक्षेत घेतला असून कारवाईची मागणी देखील केली आहे. सोशल मीडियावर सनी आणि अमीषा यांचा हा रोमँटिक सीन चांगलाच व्हायरल होत आहे या व्हिडिओमुळे गदर 2 सिनेमा वादात सापडण्याची शक्यता आहे. गुरूद्वारेत झालेल्या या प्रकारानंतर गदर 2चे दिग्दर्शक अनिल शर्मा यांनी स्पष्टीकरण देत एक पोस्ट लिहिली आहे.

दिग्दर्शक अनिल शर्मा यांची पोस्ट
नुकताच एका गुरूद्वाकाच्या बाहेरील प्रांगणात एक सीन शुट झाला. मी सर्वांना सांगू इच्छितो की माझ्या संपूर्ण टीमला आणि धार्मिक भावनांचा अत्यंत आदर आहे. आणि आम्ही त्याचे पावित्र्य राखवण्यासाठी वचनबद्ध आहोत. मी आधी ही एक सिनेमा केला आहे त्यावेळी या गोष्टी लक्षात ठेवल्या आहेत आणि भविष्यातही याची नक्कीच काळजी घेईन याची खात्री देतो. तसेच मी हे देखील स्पष्ट करू इच्छितो की, कॅप्चर करण्यात आलेलं फुटेज एका पर्सनल फोनवर करण्यात आलं आहे.

सिनेमात तो सीन तसा शुट करण्यात आलेला नाही. माझ्या कामामुळे कळत नकळत कोणाच्या भावना दुखावल्या गेल्या असलतील तर त्यासाठी मी मनापासून माफी मागतो. कोणाच्या भावना दुखावणं किंवा अनादर करण्याचा आमचा कोणताही हेतू नव्हता. माझ्याकडून झालेल्या चुकीमुळे कोणाला त्रास झाला असेल तर मला त्याचा खेद वाटतो.

आम्ही सर्व नियम आणि मार्गदर्शन तत्त्वांचं काटेकोरपणे पालन करतो जेणेकरून आमचं काम जबाबदारीने आणि आदरपूर्वक केलं जाईल. शुटींग दरम्यान गुरूद्वारा समितीने दिलेल्या पाठिब्याबद्दल आणि सहकार्याबद्दल त्यांचे आभार मानू इच्छितो. गदर 2 मुळे कोणत्याही धार्मिक भावना दुखावल्या गेल्या नाहीत आणि असंही होणारही नाही हे मी सांगू इच्छितो, असंही अनील शर्मा यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हंटले आहे.

Share This News
error: Content is protected !!