मुंबई : मनोरंजन विश्वातून एक मोठी बातमी समोर आली आहे. बॉलिवूडला अनेक हीट चित्रपट देणारे दिग्दर्शक राजकुमार संतोषी (Rajkumar Santoshi) यांच्याविषयी एक मोठी माहिती समोर आली आहे. राजकुमार संतोषी यांच्या अडचणीत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. त्यांना जामनगर कोर्टानं एका प्रकरणात 2 वर्षांची शिक्षा सुनावली आहे. याशिवाय दोन कोटी रुपयांचा दंड भरण्याचे आदेशही देण्यात आले आहेत. त्यांना ही शिक्षा का सुनावण्यात आली? नेमके काय आहे प्रकरण? त्याबद्दल जाणून घेऊया…
काय आहे नेमके प्रकरण?
राजकुमार संतोषी यांनी जामनगरचे व्यापारी अशोक लाल यांच्याकडून एक कोटी रुपये घेतले आणि ते परत न केल्यानं या प्रकरणाला सुरूवात झाली. या प्रकरणी न्यायालयाने अखेर आपला निकाल सुनावला आहे.एकेकाळी राजकुमार संतोषी आणि अशोक लाल हे खूप जवळचे मित्र होते. हे प्रकरण 2015 मध्ये सुरू झाले. 2019 मध्ये राजकुमार जामनगर कोर्टात सुनावणीसाठी हजर झाले होते. पैसे परत करण्यासाठी राजकुमार संतोषी यांनी प्रत्येकी 10 लाख रुपयांचे 10 चेक दिले होते, जे बाऊन्स झाले होते. त्यानंतरच दिग्दर्शकावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. बऱ्याच काळापासून जामनगर कोर्टात हे प्रकरण सुरु होते. गुन्हा दाखल करण्यापूर्वी या व्यावसायिकाने दिग्दर्शकाशी बोलण्याचा प्रयत्न केला होता, मात्र तसं झालं नाही. या खटल्याच्या सुनावणीलाही ते उपस्थित राहिले नाहीत. यानंतर न्यायालयाने निकाल देताना त्यांना दुप्पट रक्कम देण्याचे आदेश दिले आहेत.
राजकुमार संतोषी यांच्या वर्कफ्रंट बद्दल बोलायचे झाले तर गेल्या काही काळापासून ते त्यांच्या आगामी ‘लाहोर 1947’ या चित्रपटामुळे चर्चेत आहे.या चित्रपटात ते सनी देओलसोबत काम करत असून आमिर खानने त्याची निर्मिती केली आहे. त्यांनी आतापर्यंत शाहिद कपूर, कतरिना कैफ, अक्षय कुमार, अमिताभ बच्चन यांसारख्या मोठ्या स्टार्ससोबत काम केले आहे. 1990 मध्ये ‘घायल’ या चित्रपटातून त्यांनी दिग्दर्शन क्षेत्रात पाऊल ठेवले होते.
नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.
Supriya Sule : खासदार सुप्रिया सुळे सलग दुसऱ्यांदा ठरल्या संसद महारत्न
Eknath Shinde : ‘मी बाप आणि नवरा म्हणून अपयशी’ मुख्यमंत्र्यांनी जाहीर सभेत दिली कबुली
Pune News : पुण्यात काँग्रेसचा पुन्हा धंगेकर पॅटर्न? ‘त्या’ पोस्टरची होतेय जोरदार चर्चा
Suhani Bhatnagar Death : ‘दंगल’ फेम ‘या’ अभिनेत्रीचे 19 व्या वर्षी निधन
Fire In Tarapur : भयंकर स्फोटानं तारापूर हादरलं ! एमआयडीसीतील में मोल्टास कारखान्याला भीषण आग
ISRO Naughty Boy INSAT-3DS : इस्रो आज रचणार इतिहास! अंतराळात पाठवणार ‘नॉटी बॉय’
Pune Manchar Accident : मंचर जवळ कार-टेम्पो-कंटेनरच्या भीषण अपघात; 3 जणांचा मृत्यू