Badshah

Badshah : रॅपर बादशाहच्या अडचणीत वाढ; ‘या’ प्रकरणी सायबर सेलकडून होणार चौकशी

852 0

प्रसिद्ध गायक आणि रॅपर बादशाहच्या (Badshah) फॅन्ससाठी एक मोठी बातमी समोर आली आहे. बादशाहच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. महाराष्ट्र पोलिसांच्या सायबर सेलकडून बादशाहला चौकशीसाठी बोलावण्यात आले आहे.

काय आहे नेमके प्रकरण?
हे प्रकरण फेअरप्ले नावाच्या अ‍ॅपशी संबंधित आहे. बादशाहने या अ‍ॅपची जाहिरात केली होती. या कारणास्तव त्याला समन्स पाठवण्यात आले असून त्याला चौकशीसाठी बोलावण्यात आले आहे. फेअरप्ले नावाच्या अ‍ॅपला कोणत्याही प्रकारच्या स्ट्रीमिंगची परवानगी नसतानाही ते आयपीएल दाखवत असल्याचा आरोप करण्यात आला आहे.

वायकॉमच्या तक्रारीवरून महाराष्ट्र पोलिसांच्या सायबर सेलने फेअरप्लेवर डिजिटल कॉपीरायटरचा गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी रॅपर बादशाह सोबत आणखी बॉलीवूडमधील 40 कलाकारांना समन्स बजावले जाऊ शकते असे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे.

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!