Dolly Sohi

Dolly Sohi : ‘हिटलर दीदी’ फेम अभिनेत्री डॉली सोही हिचं निधन

884 0

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – आज महिला दिन मात्र या दिवशी बॉलिवूड विश्वातून एक दुःखद बातमी (Dolly Sohi) समोर आली आहे. कलश, हिटलर दीदी, देवों के देव महादेव यासह अनेक प्रसिद्ध टीव्ही मालिकांमध्ये काम केलेली अभिनेत्री डॉली सोही हिचं निधन झालं. तिला सर्वायकल कॅन्सरचं निदान झालं होतं. तिने वयाच्या 48 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. डॉली सोहीची बहीण अमनदीप सोही हिचासुद्धा 48 तासांपूर्वी मृत्यू झाला होता. यामुळे त्यांच्या कुटुंबावर दुःखाचा मोठा डोंगर कोसळला आहे.

डॉली सोहीच्या निधनाची माहिती तिच्या कुटुंबियांनी दिली. डॉलीचा भाऊ मनु याने सांगितलं की, डॉलीचं सकाळी निधन झालं. यामुळे आमच्या कुटुंबियांना मोठा धक्का बसला आहे. तिच्यावर आज दुपारी अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे. अमनदीप सोहीसुद्धा टीव्ही अभिनेत्री होती. दोन दिवसात दोन्ही बहिणींच्या निधनाने कुटुंबियांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.

गेल्या काही महिन्यांपासून डॉली सोहीची प्रकृती खालावली होती. तिला श्वास घेण्यास त्रास होत होता. मुंबईतील एका रुग्णालयात तिच्यावर उपचार सुरू होते. गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये तिला सर्वायकल कॅन्सर झाल्याचं समोर आलं होतं.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

Mahashivratri : महाशिवरात्रीच्या निमिताने जाणून घेऊया भारतातील शंकराच्या 12 ज्योतिर्लिंगांबद्दल

Women’s Day Special : आज महिला दिनाच्या निमित्त महिलांच्या अधिकारांबद्दल जाणून घेऊया

Virabhadrasana : वीरभद्रासन म्हणजे काय? त्याचे काय आहेत फायदे?

Share This News
error: Content is protected !!