Swapnil Mayekar

मराठमोळे लेखक – दिग्दर्शक स्वप्नील मयेकर यांचं निधन

1341 0

मुंबई : मराठमोळे लेखक-दिग्दर्शक स्वप्नील मयेकर यांचे आज पहाटे अल्पशा आजारामुळे निधन झाले आहे. ते 46 वर्षांचे होते. स्वप्नील मयेकर यांच्या अचानक झालेल्या निधनामुळे मराठी चित्रपटसृष्टीवर शोककळा पसरली आहे. स्वप्नील यांचे आज पहाटे चेंबूर घाटलागाव येथे राहत्या घरी निधन झाले आहे.स्वप्नील मयेकर यांच्या पश्चात पत्नी आणि दोन मुली असा परिवार आहे.

स्वप्निल यांनी ‘हा खेळ संचितांचा’ या मालिकेसाठी सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम केले होते. यानंतर त्यांनी स्वतंत्र लेखक दिग्दर्शक म्हणून मराठी पाऊल पडते पुढे हा चित्रपट बनवला मात्र तो रिलीज होण्यापूर्वीच स्वप्नील मयेकर यांचं निधन झाले आहे. या चित्रपटात अभिनेता चिराग पाटील आणि अभिनेत्री सिद्धी पाटणे, जेष्ठ अभिनेते अनंत जोग, सतीश पुळेकर, अभिनेते सतीश सलागरे आणि संजय कुलकर्णी या कलाकारांनी महत्वाच्या भूमिका साकारल्या आहेत.

https://www.instagram.com/p/BxRq1mOHD9r/?utm_source=ig_embed&ig_rid=bc85bcfb-9108-4c1d-9600-ee55c5b8aa3a

‘मराठी पाऊल पडते पुढे’ या चित्रपटामध्ये एका धडाडी तरुण उद्योजकाची कथा दाखवण्यात आली आहे. या चित्रपटामध्ये अ‍ॅक्शन, इमोशन्स आणि दर्जेदार डायलॉग्ज पाहायला मिळणार आहे. या चित्रपटातील गाणी प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहेत. प्रेक्षक या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत आहेत.

Share This News
error: Content is protected !!