दे धक्का 2 : मराठी चित्रपट सृष्टी मध्ये तयार झालेला ‘दे धक्का’ या चित्रपटाने प्रेक्षकांचे भरभरून मनोरंजन केले होते. या चित्रपटांमध्ये कॉमेडी आणि भावनांचा उत्तम वेळ साधण्यात आला होता . नृत्य ,गाणी मकरंद अनासपुरे सारख्या अभिनेत्यासह सिद्धार्थ जाधव यांच्या कॉमिक टाइमिंगने चित्रपटाला एका वेगळ्याच उंचीवर नेऊन ठेवले होते. शिवाजी साटम, मेधा मांजरेकर, संजय खापरे आणि सक्षम कुलकर्णी यांच्या प्रमुख भूमिका असलेला या चित्रपटाचा दुसरा भाग येत्या ५ ऑगस्ट रोजी दे धक्का २ चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होतो आहे. त्यामुळे मराठी चाहत्यांमध्ये उत्साह पाहायला मिळतो आहे.
अमेय विनोद खोपकर एंटरटेनमेंट आणि स्कायलिंक एंटरटेनमेंट प्रस्तुत ‘दे धक्का २’ हा चित्रपट ५ ऑगस्ट २०२२ रोजी प्रदर्शित होण्यासाठी सज्ज झाला आहे . नुकताच या चित्रपटाचा ट्रैलर सोशल मीडिया वर रिलीज झाला आणि त्याला रसिक प्रेक्षकांनी प्रचंड प्रतिसाद दिला, अल्पावधीत 2 मिलियनहुन अधिक व्युज टिझरला मिळाले .
सुपरहिट ‘दे धक्का ‘ २००८ साली प्रदर्शित झाला होता. अतुल काळे आणि सुदेश मांजरेकर यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शिन केले होते. मकरंद अनासपुरे, सिद्धार्थ जाधव, शिवाजी साटम, मेधा मांजरेकर, संजय खापरे आणि सक्षम कुलकर्णी यांच्या प्रमुख भूमिका असलेला हा चित्रपट महाराष्ट्रातील एका खेडेगावातील एका वेड्या कुटुंबाच्या ऑटो-रिक्षामधील प्रवासाविषयी होता.
दे धक्का 2 चे दिग्दर्शन महेश मांजरेकर आणि सुदेश मांजरेकर यांनी केले आहे. महेश मांजरेकर यांनी कथा आणि पटकथा लिहिली आहे , संवाद लेखन गणेश मतकरी यांनी केले आहे. करण रावत हे सिनेमॅटोग्राफर आहेत तसेच चित्रपटाचे एडिटिंग सतीश पडवळ आणि नीलेश गावंड यांनी केले आहे.
दे धक्का २ मधील गाणी संगीतकार हितेश मोडक यांनी संगीतबद्ध केली आहेत तर गीतकार मंदार चोळकर आणि नेहा शितोळे हे आहेत.आघाडीचे गायक अवधूत गुप्ते, वैशाली माडे, शमिका भिडे, रिया भट्टाचार्य या चित्रपटाला लाभले आहे . सिनेमाचे संगीत ‘व्हिडिओ पॅलेस’ ने प्रदर्शित केले आहेत.’दे धक्का २’ ची निर्मिती यतीन जाधव आणि स्वाती खोपकर यांनी केली आहे. निनाद नंदकुमार बत्तीन आणि तबरेझ पटेल यांनी सह निर्मिती केली आहे तसेच असोसिएट निर्माते कर्मिका टंडन आणि विशिष्टा दुसेजा हे आहेत .