city of dreams

प्रतीक्षा संपली ! ‘सिटी ऑफ ड्रीम्स’ चा तिसरा सीझन ‘या’ दिवशी येणार प्रेक्षकांच्या भेटीला

636 0

मुंबई : ‘सिटी ऑफ ड्रीम्स ‘ (City Of Dreams) या सीरिजचे दोन्ही सीझन सुपरहिट ठरले आहेत. त्यानंतर प्रेक्षकांना या सीरिजच्या तिसऱ्या सिझनची उत्सुकता लागून राहिली होती. काही दिवसांपूर्वी या सिरींजचा ट्रेलर प्रदर्शित झाला होता. या ट्रेलरमधील डायलॉगानी प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतले होते. यामुळे प्रेक्षकांना या सिरीजची अधिक उत्सुकता लागून राहिली आहे. या सिरीजमध्ये प्रेक्षकांना सत्तेसाठीचा संघर्ष पाहायला मिळणार आहे.

‘सिटी ऑफ ड्रीम्स 3’मध्ये काय पाहायला मिळणार?
पहिल्या दोन सीझनमध्ये गायकवाड हे पात्र केंद्रस्थानी होतं. सत्तेसाठी प्रियजनांची हत्या किंवा मुलीने वडिलांच्या इच्छेविरुद्ध राजकारणात केलेला प्रवेश असो, या सर्व गोष्टी प्रेक्षकांनी पहिल्या दोन सीझनमध्ये पाहिल्या आहेत. पण आता तिसऱ्या सीझनमध्ये जगदीश गुरव आपली इच्छा व्यक्त करताना दिसणार आहेत. या सिरीजमध्ये साम दाम दंड भेदाचा अवलंब करत सत्ता बळकावण्याचा प्रयत्न होताना दिसणार आहे.

‘सिटी ऑफ ड्रीम्स 3’ कधी होणार रिलीज?
‘सिटी ऑफ ड्रीम्स 3’ (City Of Dreams 3) या सीरिजमध्ये अतुल कुलकर्णी (Atul Kulkarni), सचिन पिळगावकर (Sachin Pilgaonkar) आणि प्रिया बापट (Priya Bapat) मुख्य भूमिकेत आहेत. 26 मे 2023 रोजी ही सीरिज प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!