Boys 4

Boyz 4 : ‘बॉईज 4’ मध्ये झळकणार ‘हे’ दमदार कलाकार; आता होणार मोठा कल्ला

1023 0

मुंबई : ‘बॉईज 4’ हा सिनेमा (Boyz 4) लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या सिनेमाची घोषणा झाल्यापासून प्रेक्षक या सिनेमाची आतुरतेने वाट पाहत आहेत. नुकतेच या सिनेमाचे पोस्टर रिलीज झाले आहे. या पोस्टरवरून ‘बॉईज 4’ या सिनेमात दमदार कलाकारांची फळी दिसणार आहे. ‘बॉईज’,’बॉईज 2′,’बॉईज 3′ या तिन्ही सिनेमांनी बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला आहे. आता या बॉईजची धमाल चौपट पटीने वाढणार आहे. ‘बॉईज 4’ हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

‘या’ चित्रपटात कोण कोण झळकणार?
सुमंत शिंदे, पार्थ भालेराव आणि प्रतिक लाड यांच्यासोबत बॉईजमध्ये झळकलेली ऋतिका श्रोत्री ‘बॅाईज 4’मध्येही दिसणार आहे. तसेच अभिनय बेर्डे, निखील बने, गौरव मोरे, रितुजा शिंदे, जुई बेंडखळे ही नवी फळी देखील यामध्ये पाहायला मिळणार आहे. या व्यतिरिक्त या चित्रपटात गिरीष कुलकर्णी, यतीन कार्येकर, समीर धर्माधिकारी आणि ओम पाटील यांच्याही प्रमुख भूमिका आहेत.

या चित्रपटाबद्दल बोलायचे झाले तर सुप्रीम मोशन पिक्चर्स प्रा. लि. प्रोडक्शन अंतर्गत एव्हरेस्ट एंटरटेनमेंटसह अवधूत गुप्ते प्रस्तुत या चित्रपटाचे लालासाहेब शिंदे, राजेंद्र शिंदे, संजय छाब्रिया निर्माते आहेत तर विशाल सखाराम देवरूखकर दिग्दर्शित या चित्रपटाचे लेखन हृषिकेश कोळी यांनी केले आहे.

Share This News
error: Content is protected !!