मुंबई : मिस्टर परफेक्ट आमिर खानची नवीन फिल्म लाल सिंह चड्ढा रिलीज होण्यापूर्वीच विवादांमध्ये अडकला आहे. #boycottlaalsinghchaddha मुळे सध्या अमिरवर संकटांचे मोठे ढग आहेत . हा चित्रपट बॉयकट करण्याची मागणी केली जात असून आमिर खान सातत्याने लालसिंग चड्डा बॉयकॉट केला जाऊ नये यासाठी अपील करत आहे . मिस्टर परफेक्टने आपली येती फिल्म बॉक्स ऑफिसवर नेहमीप्रमाणे हिट ठरावी यासाठी या फिल्ममध्ये आता मोठे बदल देखील केले असल्याचे समजते आहे . हे बदल नक्की काय आहेत हे आपण जाणून घेणार आहोत …
आमिर खानने त्याची फिल्म लाल सिंह चड्डा साउथ स्टार एस.एस. राजामोली ,चिरंजीवी ,नागार्जुना यांना दाखवली. आणि त्यांच्या प्रतिक्रिया काय आहेत हे जाणून घेतलं . त्यानुसार साउथ मार्केटमध्ये आपला प्रचार करण्याच्या हेतूने आमिर खान म्हणाला आहे की,” जर हिंदी भाषिक तमिळ तेलगू आणि इतर भाषेतील फिल्म्सला पसंत करू शकतात , तर तमिळ आणि तेलुगु ऑडियन्स देखील हिंदी फिल्मला वेलकम करू शकतील. ” त्यामुळेच आता आमिर खान तमिळ आणि तेलगू ऑडिओ पर्यंत पोहोचण्याचा देखील जोरदार प्रयत्न करत आहे.
प्रदर्शनापूर्वीच साउथ इंडस्ट्रीतील सुप्रसिद्ध डायरेक्टर एस.एस. राजामोली यांनी ही फिल्म पाहिल्यानंतर यामध्ये एक असा पॉईंट आमिर खान आणि डायरेक्टर अद्वैत चंदन यांच्या निदर्शनास आणून दिला की जो त्यांना योग्य वाटला. आणि हाच मोठा बदल या फिल्ममध्ये करण्यात आला असल्याचं आमिर खान यांनी सांगितला आहे . आता अर्थात नक्की हा बदल काय आहे यावर आमिर खान यांनी भाष्य करणे टाळला आहे . परंतु हा बदल नक्कीच योग्य असल्याचा देखील त्याचं म्हणणं आहे .
येत्या 11 ऑगस्टला चित्रपटगृहांमध्ये लाल सिंह चड्ढा रिलीज होणार आहे . तथापि लोकांची यावर असलेली संतप्त प्रतिक्रिया पाहता लाल सिंह चढ्ढाच भविष्य कसं असेल हे येत्या नऊ दिवसात स्पष्ट होणारच आहे . त्यामुळे मिस्टर परफेक्शन लिस्टचे आत्तापर्यंत गाजलेले सर्व चित्रपट पाहता लाल सिंह चड्ढा बॉक्स ऑफिसवर काय कमाल दाखवू शकतो हे 11 ऑगस्टला स्पष्ट होईल