Bollywood Today :दीपिका-रणवीरच्या ‘सी फेसिंग’ अपार्टमेंटची किंमत ऐकलीत का?वाचून थक्क व्हाल…

250 0

Bollywood Today :दीपिका पदुकोण आणि रणवीर सिंग हे बॉलीवूडचे पॉवर कपल आहेत. दोघांनीही आजपर्यंत दर्जेदार चित्रपटांमध्ये उठावदार अभिनय करून यशाचे शिखर गाठले आहे. आपल्या करिअरमध्ये यशस्वी या जोडप्याने नुकताच एक अपार्टमेंट खरेदी केले आहे.

Most sensible thing was moving into her set-up: Ranveer Singh on moving  into Deepika Padukone's home after marriage - The Statesman
मिळालेल्या माहितीनुसार,हे आलिशान घर देशातील महागड्या घरांपैकी एक असून या अपार्टमेंट मधून समुद्राचा सुंदर असा नजारा पाहता येऊ शकतो. विशेष म्हणजे शाहरुख खानचे मन्नत आणि सलमान खानच्या गॅलेक्सीच्या अगदीच जवळ दीपिका रणवीरचे हे चार मजली अपारमेंट आहे. ११ हजार २६६ चौरस फुटात असलेले हे अपार्टमेंट 16,17,18 आणि 19 व्या मजल्यावर असून रणवीरला 18 पार्किंग स्लॉट देखील मिळाले आहेत.

या घरासाठी रणवीरने ७ कोटी १३ लाख रुपये महसूल विभागाला मुद्रांक शुल्क भरले असून, या अपार्टमेंटची किंमत ऐकून तुम्ही थक्क व्हाल. तर या अपार्टमेंटची किंमत आहे,सुमारे 119 कोटी रुपये… नक्कीच हे आलिशान घर दीपिका आणि रणवीरच्या स्वप्नातील घर आहे. सध्या या घराचे कामकाज अंडर कन्स्ट्रक्शन आहे.

Share This News
error: Content is protected !!