Ankita Lokhande

Ankita Lokhande : बॉलीवूड अभिनेत्री अंकिता लोखंडेच्या वडिलांचे निधन

982 0

मुंबई : पवित्र रिश्ता फेम आणि बॉलिवूड अभिनेत्री अंकिता लोखंडे (Ankita Lokhande) हिच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. अंकिता लोखंडे (Ankita Lokhande) हिच्या वडिलांचं निधन झालं आहे. यामुळे तिच्यावरचे मायाचे छत्र हरपलं आहे. अंकिताचे वडील हे गेल्या काही दिवसांपासून आजारी होते. ते 68 वर्षांचे होते. आज सकाळी 11 वाजता ओशिवरा इथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे.

अंकिता लोखंडे सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. तिने तिच्या अकाऊंटवर अनेक वेळा वडिलांसोबत नेहमी फोटो आणि व्हिडीओ शेअर केले आहे. काहीच दिवसांपूर्वी फादर्स डेच्या निमित्ताने अभिनेत्रीने तिच्या वडिलांसोबतचा एक भावनिक व्हिडीओ शेअर केला होता. या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता कि ती तिच्या वडिलांच्या किती जवळ होती.

अंकिताचे कुटुंब हे मुळचे इंदूरचे असून तिचे वडील शशिकांत लोखंडे हे बँकर होते आणि आई वंदना या शिक्षिका होत्या. मायेचं छत्र हरपल्यामुळे अंकिता पूर्णपणे कोलमडली आहे. कुटुंबातील इतर सदस्य तिला सांभाळण्याचा प्रयत्न करत आहेत.

Share This News
error: Content is protected !!