Mithun Chakraborty

Mithun Chakraborty : मिथुन चक्रवर्ती यांची प्रकृती खालावली; तातडीने रुग्णालयात दाखल

792 0

मुंबई : बॉलिवूडचे ज्येष्ठ अभिनेते मिथुन चक्रवर्ती (Mithun Chakraborty) यांच्याविषयी महत्त्वाची माहिती समोर आली आहे. मिथुन चक्रवर्ती यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांच्या छातीत दुखू लागल्यानं त्यांना कोलकत्ता येथील रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. त्यांना अस्वस्थ वाटू लागल्यानं त्यांना तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.

घरी असताना बराच वेळ त्यांना अस्वस्थ वाटत होतं. त्यामुळे त्यांना तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आलं. त्यांना ब्रेन स्ट्रोक आला होता. त्यानंतर आता त्यांना न्यूरो सर्जकडे रेफर करण्यात येणार आहे अशी माहिती त्यांच्या जवळच्या नातेवाईकांकडून देण्यात आली आहे. मिथुन चक्रवर्ती यांच्या प्रकृतीबाबत माहिती मिळताच त्यांच्या चाहत्यांनी काळजी व्यक्त केली आहे.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

Jalgaon Crime News : धक्कादायक ! जळगावमध्ये भाजपच्या माजी नगरसेवकाची गोळ्या घालून हत्या

Share This News
error: Content is protected !!
WhatsApp

WhatsApp

1
Join Us On WhatsApp 😊.
Hide