Bigg Boss 17

Bigg Boss 17 : ‘या’ दिवशी सुरू होणार ‘बिग बॉस 17’; प्रोमो रिलीज

1035 0

छोट्या पडद्यावरील वादग्रस्त पण तितकाच लोकप्रिय असणारा कार्यक्रम म्हणजे ‘बिग बॉस’. या कार्यक्रमाचं नवं पर्व अर्थात ‘बिग बॉस 17’ (Bigg Boss 17) लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. बॉलिवूड अभिनेता सलमान खान या कार्यक्रमाचा होस्ट असणार आहे. या कार्यक्रमाचा प्रोमो समोर आला आहे. ‘बिग बॉस ओटीटी’नंतर आता ‘बिग बॉस 17’ प्रेक्षकांच्या भेटीसाठी सज्ज आहे. या कार्यक्रमाचा प्रोमो सध्या सगळ्यांच्या पसंतीस पडला आहे. ‘बिग बॉस 17’मध्ये प्रेक्षकांना अनेक ट्वीस्ट पाहायला मिळणार आहेत.

‘बिग बॉस 17’ या कार्यक्रमाचा प्रोमो कलर्स टीव्हीने शेअर केला आहे. हा प्रोमो शेअर करताना त्यांनी या कार्यक्रमाची प्रीमियर डेटदेखील जाहीर केली आहे. कलर्स टीव्हीने प्रोमो शेअर करत लिहिलं आहे,”जिसके सीने में हो जिगर, उनको बिग बॉसके औरसे क्या होगी फिकर”.

‘बिग बॉस 17’ या दिवशी येणार प्रेक्षकांच्या भेटीला
सलमान खानच्या ‘बिग बॉस 17’ या कार्यक्रमात एकापेक्षा एक स्पर्धक सहभागी होणार आहेत. 15 ऑक्टोबर रात्री 9 वाजता ‘बिग बॉस 17’ या कार्यक्रमाचा प्रीमियर होणार आहे. तर जिओ सिनेमा या ओटीटी प्लॅटफॉर्मवर हा कार्यक्रम प्रेक्षकांना 24 तास पाहता येणार आहे.

Share This News
error: Content is protected !!