Bhairavi Vaidya

Bhairavi Vaidya : ज्येष्ठ अभिनेत्री भैरवी वैद्य यांचे निधन

1479 0

मुंबई : प्रसिद्ध चित्रपट आणि टीव्ही अभिनेत्री भैरवी वैद्य (Bhairavi Vaidya) यांचं निधन झाले आहे. ते 67 वर्षांचे होते. यामुळे मनोरंजनसृष्टीवर शोककळा पसरली आहे. जवळपास, 45 वर्ष त्या मनोरंजनक्षेत्रात काम करत होत्या. त्या मागच्या सहा महिन्यांपासून कर्करोगाशी झुंज देत होत्या. अभिनेत्री भैरवी वैद्य यांनी अनेक हिट चित्रपटांमध्ये काम केलं आहे.

भैरवी वैद्य यांनी गुजराती आणि हिंदी चित्रपटांमध्ये भैरवी यांनी काम केलं. नीमा डेन्जोंगपा या मालिकेमध्ये त्यांनी पुष्पा ही भूमिका साकारली. त्यांची ही भूमिका लोकांना खूप आवडली होती. तसेच चोरी चोरी चुपके चुपके या सलमान खानच्या चित्रपटामध्ये देखील त्यांनी काम केले होते. ऐश्वर्या राय बच्चनच्या ताल या चित्रपटामधील जानकी ही भूमिका साकारून त्यांनी चित्रपटसृष्टीत पदार्पण केलं. ‘व्हॉट्स योर राशी’, ‘हमराज’, ‘क्या दिल ने कहा’ या चित्रपटांमध्ये देखील भैरवी वैद्य यांनी प्रमुख भूमिका साकारली होती.

भैरवी यांच्या निधनानंतर अनेक कलाकारांनी शोक व्यक्त केला आहे. ‘व्हेंटिलेटर’ या चित्रपटात भैरवी यांच्यासोबत प्रतीक गांधीनं काम केलं. भैरवी यांच्या निधनानंतर प्रतीकनं भैरवी यांच्या निधनानंतर शोक व्यक्त केला आहे. व्हेंटिलेटर चित्रपटात त्यांच्यासोबत काम करण्याची संधी मला मिळाली. आमच्यात खूप छान बॉन्डिंग होते. मी त्यांना माझ्या लहानपणापासून टीव्हीवर पाहत आलो आहे. त्यांचा हसरा चेहरा मी कधीच विसरू शकत नाही असे प्रतीक गांधी म्हणाला आहे.

Share This News
error: Content is protected !!