Baipan Bhaari Deva

Baipan Bhaari Deva : काष्ठी साडी अन् डोक्यावर पदर घेत 80 वर्षांच्या आजींनी सुकन्या मोनेबरोबर घातली भन्नाट फुगडी

938 0

मुंबई : संपूर्ण महाराष्ट्रात बाईपण भारी देवा (Baipan Bhaari Deva) या सिनेमा मोठ्या प्रमाणात गाजत आहे. या चित्रपटाला लोकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. विशेषकरून महिला वर्गाचा त्याला (Baipan Bhaari Deva) मोठा प्रतिसाद मिळताना दिसत आहे. लहानांपासून ते वयस्कर व्यक्ती या चित्रपट मोठ्या उत्साहाने पाहताना दिसत आहेत. सध्या सोशल मीडियावर एका 80 वर्षांच्या आजींचा व्हिडिओ व्हायरल होताना दिसत आहे. या व्हिडिओमध्ये त्या अभिनेत्री सुकन्या मोने यांच्यासोबत फुगडी घालताना दिसत आहेत.

केदार शिंदे दिग्दर्शित बाईपण भारी देवा या सिनेमानं 65 कोटींचा टप्पा पार केला आहे. 24 दिवसात अफाट यश मिळवणारा हा पहिलाच मराठी सिनेमा आहे. 6 बहिणींची गोष्ट सांगणाऱ्या या अभिनेत्री रोहिणी हट्टंगडी, सुकन्या मोने, शिल्पा नवलकर, सुचित्रा बांदेकर, वंदना गुप्ते आणि दीपा परब यांनी प्रमुख भुमिका साकारल्या आहेत. सहा बहिणींनी सिनेमात चांगलाच कल्ला केला आहे.

नुकतंच सिनेमाच्या टीमनं (Baipan Bhaari Deva) कोल्हापूरच्या महालक्ष्मीचं दर्शन घेतलं. अभिनेत्री सुकन्या मोने यांनी सिनेमात तर कल्ला केलाच आहे. पण सिनेमाच्या प्रमोशन दरम्यान देखील त्या कल्ला करताना दिसत असतात. कोल्हापूरात सिनेमा पाहण्यासाठी आलेल्या 80 वर्षांच्या आजीबरोबर बाईपण भारी देवाच्या हुकस्टेपवर सुकन्या यांनी ठेका धरला आहे. यामध्ये सुकन्या मोने एका 80 वर्षांच्या आजींसोबत फुगडी घालताना दिसत आहेत. या दोघींचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होताना दिसत आहे.

Share This News
error: Content is protected !!