राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते आणि माजी राज्यमंत्री बाबा सिद्दिकी यांची शनिवारी गोळ्या घालून हत्या करण्यात आली बाबा सिद्दिकी हे राजकारणी तर होतेच मात्र त्यांचं बॉलिवूडशीही खास कनेक्शन होतं… बाबा सिद्दिकींचा बॉलीवूड कनेक्शन कसं होतं पाहूयात….
बाबा सिद्दिकी 48 वर्ष काँग्रेसचे नेते त्यानंतर नुकताच त्यांनी अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केला होता. बाबा सिद्दिकी हे राजकारणी तर होतेच. यासोबतच बाबा सिद्दिकी यांच्या इफ्तार पार्टीची मोठी चर्चा व्हायची या इफ्तार पार्टीमध्ये बॉलिवूडमधील अनेक सेलिब्रेटी, राजकारणी एकत्र येत असत. बाबा सिद्दिकी यांच्यावर अभिनेते सुनील दत्त यांचा मोठा प्रभाव होता. सुनील दत्त यांच्याच विचारांनी प्रेरित होऊन बाबा सिद्दिकी यांनी समाजकार्य करण्याचा निर्णय घेतला. बाबा सिद्दिकी यांची इफ्तार पार्टी पार्टी केवळ धार्मिक न राहता समाजातील विविध घटकांना एकत्र आणण्याचे आणि एकता व बंधुत्व वाढवण्याचे प्रभावी साधन ठरली. बाबा सिद्दिकी यांचं सलमान खान सोबत खास नातं होतं असं म्हटलं जायचं.
सलमान खान आणि शाहरुख खान यांच्यातील वाद मिटवण्यात बाबा सिद्दिकी यांचा मोठा वाटा होता. 2008 मध्ये कतरिना कैफच्या वाढदिवसाच्या पार्टीत शाहरुख आणि सलमान यांच्यात वाद झाला होता, ज्यामुळे दोघेही एकमेकांशी बोलत नव्हते. अनेक कार्यक्रमांमध्येही ते एकमेकांना टाळताना दिसत होते मात्र 2013 मध्ये बाबा सिद्दिकींनी इफ्तार पार्टीदरम्यान, या दोन्ही कलाकारांमध्ये चालू असलेले मतभेद आणि तणाव कमी करून त्यांना पुन्हा एकत्र आणले.
सलमान आणि शाहरुख, जे अनेक वर्ष एकमेकांशी बोलतही नव्हते ते या इफ्तार पार्टीत एकमेकांची गळाभेट घेताना दिसले, आणि हीच त्यांच्या मैत्रीची नवी नांदी ठरली.